Facebook चे नाव बदलले, मार्क झुकरबर्गने केली नव्या नावाची घोषणा; लोगोतही बदल


नवी दिल्ली :सोशल मीडियावर अग्रेसर असणाऱ्या फेसबुकने (Facebook) आपले नाव बदलले आहे.. फेसबुकचा संस्थापक आणि कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्गने याविषयी माहिती दिली. कंपनीच्या वार्षिक सभेत याविषयीची घोषणा करण्यात आली. यासंदर्भात बोलत असताना,  झुकरबर्गने आता आपण मेटाव्हर्स पद्धतीने उत्पादने निर्माण करुन वापरकर्त्यांना आकर्षित करण्याच्या उद्देशाने हे नाव बदलत असल्याचे सांगितले आहे. फेसबुकचे नवे नाव ‘META’ असे  […]

लसीच्या कच्च्या मालासाठी अदर पुनावालांची थेट अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांना विनंती


पुणे : देशभरात कोरोनाची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये लॉकडाऊन लावण्यास सुरुवात करण्यात आली आहे. तर दुसरीकडे देशभरात लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करताना दिसत आहे. अशातच लसींच्या निर्मितासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा तुटवडा निर्माण झाला असल्याची माहिती सिरम इन्स्टिट्यूटचे सीईओ अदर पुनावाला यांनी काही दिवसांपूर्वी दिली होती. अमेरिका आणि युरोपने पुरवठा थांबवला असल्याचं […]

सावधान ! आता आईस्क्रीममध्येही कोरोना विषाणू आढळला; बॉक्स बाजारात पोहोचल्याने खळबळ


नवी दिल्ली : चीनमधून सुरु झालेल्या कोरोना विषाणूने जगभरात धुमाकूळ घातला आहे. जग कोरोनापासून सावरण्याचा प्रयत्न करत असतानाच आणखी एक धक्कादायक बातमी चीनमधून समोर आली आहे. चीनमधल्या तियानजिन शहरात आईस्क्रीममध्ये कोरोना व्हायरस सापडला आहे. चीनच्या पूर्वेकडील तियानजिन भागात आईस्क्रीम विकले जात होते. येथील स्थानिक कंपनी या आईस्क्रीमची निर्मिती करत होती. तपासणीसाठी आईस्क्रीमचे काही नमुने घेण्यात […]

श्रीविजया एअरलाइन्सचे विमान समुद्रात कोसळले,विमानात 62 प्रवासी


नवी दिल्ली : इंडोनेशियाची राजधानी जकार्ता येथून उड्डाण केल्यानंतर श्रीविजया एअरचं प्रवासी विमान कोसळलं असल्याची दाट शक्यता आहे. बोईंग 737 प्रकारच्या या विमानात 62 प्रवासी होते. उड्डाण केल्यानंतर काही मिनिटात विमानाचा हवाई वाहतूक नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला होता. विमान समुद्रात कोसळल्याची शक्यता आहे. जर्कातावरुन उड्डाण केल्यानंतर श्रीविजय एअरचे प्रवासी विमान अवघ्या चार मिनिटात 10 हजार फूट […]

भारताने जॉर्जियाला कोरोना लस उपलब्ध करून द्यावी – राजदूत अर्चिल झुलियाश्विली


मुंबई : जॉर्जिया देश लोकसंख्या व भौगोलिक आकारमानाने लहान असला तरीही तेथे कोरोनारुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय असल्याचे सांगून कोरोनाची नवी लस मिळण्याबाबत जॉर्जियाला भारताकडून सहकार्याची अपेक्षा असल्याचे जॉर्जियाचे भारतातील राजदूत अर्चिल झुलियाश्विली यांनी सांगितले. राजदूत झुलियाश्विली यांनी राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. कोरोना उद्रेकानंतर भारताप्रमाणेच जॉर्जियाने लॉकडाऊन जाहीर केला. मात्र […]