रेशनकार्ड हरवलय चिंता नको,दुबार रेशन कार्ड (शिधापत्रिका) मिळण्यासाठी कागदपत्रे

मुंबई : राज्य सरकारांकडून आपल्या राज्यातील नागरिकांसाठी अन्नाची पुर्तता व्हावी यासाठी रेशन कार्ड म्हणजेच शिधापत्रिका प्रदाने केली आहे. राज्यातील गरीब नागरिाकांना राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत स्वस्त दरात अनुदानित खाद्यपदार्थ पुरवले जातात. काही ठिकाणी ही नागरिकांच्या ओळखीची सामान्य कागदपत्रेही आहेत. सरकारी कामांसाठी रेशनकार्ड महत्त्वाचा पुरावा मानला जातो.

कोणत्याही सरकारी कामासाठी सरकारी कार्यालयात गेल्यानंतर रेशनकार्ड आहे का? अशी विचारणा केली जाते. काही कारणाने स्वतःचे रेशनकार्ड नसणे, रेशनकार्ड हरवणे किंवा खराब झालेले रेशनकार्ड बदलून घेण्याची प्रक्रिया किचकट असल्याचे समजले जाते,पण आता रेशनकार्ड हरवले अथवा जीर्ण होउन खराब झाले असल्यास चिंतेचे कारण नाही किंवा ऐजंट कडे जायची आवश्यकता नाही.खालील कागदपत्रांची पुर्तता करत आपण नवीन रेशनकार्ड मिळवु शकता.

दुबार रेशन कार्ड (शिधापत्रिका) मिळण्यासाठी कागदपत्रे

१.रेशन कार्ड (शिधापत्रिका) हरविले असल्यास कार्ड हरविलेबाबत पोलिसांचा दाखला

२.दुकानदारांकडील रेशन कार्ड (शिधापत्रिका) चालू असल्याबाबत सही व शिक्का दाखला

३.रेशन कार्ड (शिधापत्रिका) जीर्ण झाली असल्यास मूळ कार्ड व दुकानदाराचा सही व शिक्का असणे आवश्यक आहे.

४.जीर्ण कार्डवरील अक्षर पुसट असेलतर साध्या कागदावरील स्वघोषणापत्र करणे आवश्यक आहे

५.अर्जासोबत ओळखपत्र पुरावा

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.