आता मोबाईलवर घरबसल्या बनवा आपले रेशनकार्ड

मुंबई : प्रत्येक व्यक्तीसाठी रेशनकार्ड हे आधार आणि पॅनकार्ड इतकेच महत्वाचे असते.प्रत्येक शासकीय कामांसाठी आपल्याला नेहमी याची आवश्यकता असतेच असते. सर्व सरकारी कामासाठी उपयुक्त ठरणारे रेशनकार्डात जर अजूनही नसल्यास घाबरून जाण्याची गरज नाही.

तुम्हाला आता रेशन कार्ड तयार करण्यासाठी कुठेही जाण्याची गरज नाही. याचे कारण असे की, आता घरबसल्या स्मार्टफोनद्वारे रेशन कार्ड बनवता येणार आहे. यामुळे तुमच्या अमुल्य वेळेची देखील बचत होणार आहे. चला तर मग जाणून घेऊयात कसे बनवावे स्मार्टफोनद्वारे रेशन कार्ड..!

अर्ज असा करा…

सर्वप्रथम रेशन कार्ड मिळविण्यासाठी पहिले आपल्या राज्याच्या अधिकृत वेबसाइटवर जा. यानंतर रेशन कार्डसाठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या लिंकवर क्लिक करा. त्यानंतर आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, पासपोर्ट, आरोग्य कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स इत्यादी रेशन कार्ड बनविण्यासाठीचा आयडी प्रूफ म्हणून देता येईल.

याचबरोबर अर्ज भरल्यानंतर ०५ ते ४५ रुपये फी भरा आणि अर्ज सबमिट करा. अर्ज सबमिट केल्यानंतर फील्ड व्हेरिफिकेशननंतर, जर तुमचा अर्ज योग्य आढळला तर तुमचे रेशन कार्ड तयार होईल.

नवीन रेशन कार्ड (शिधापत्रिका) मिळण्यासाठी कागदपत्रे

१. अर्ज कुटुंबातील ज्येष्ट स्त्री हिचा कुटुंबप्रमुख म्हणून तिच्या नावे अर्ज
२.अर्जदार कुटुंब प्रमुख स्त्रिचे २ फोटो, त्यावर अर्जदाराची सही करुन जोडावे
३.अर्जासोबत बँक जॉईंट अकाऊंट (पती व पत्नीचे नावे) काढलेबाबतचे बँक पासबुकची प्रत
४.आधार कार्डची प्रत अथवा आधार कार्ड नोंदणी केलेबाबतची पावतीची साक्षांकित छायांकित प्रत
५.नवीन शिधापत्रिका अर्जासोबत पूर्वीच्या ठिकाणचा शिधापत्रिकेतील नाव कमी केल्याबाबतचा दाखला जोडणे आवश्यक आहे, नसेलतर मूळ ठिकाणचे तहसीलदार यांचा नाव नसलेबाबतचा दाखला
६.राहत्या जागेचा पुरावा म्हणून स्वत:चे घर असल्यास विज बिल किंवा चालू वर्षाचे मिळकत कर पावती, तसेच घर भाड्याचे असल्यास घर मालकाचे संमतीपत्र व त्यांचे नावे विज बिल किंवा चालू वर्षाची मिळकत कर पावती

दुबार रेशन कार्ड (शिधापत्रिका) मिळण्यासाठी कागदपत्रे

१.रेशन कार्ड (शिधापत्रिका) हरविले असल्यास कार्ड हरविलेबाबत पोलिसांचा दाखला
२.दुकानदारांकडील रेशन कार्ड (शिधापत्रिका) चालू असल्याबाबत सही व शिक्का दाखला
३.रेशन कार्ड (शिधापत्रिका) जीर्ण झाली असल्यास मूळ कार्ड व दुकानदाराचा सही व शिक्का असणे आवश्यक आहे.
४.जीर्ण कार्डवरील अक्षर पुसट असेलतर साध्या कागदावरील स्वघोषणापत्र करणे आवश्यक आहे
५.अर्जासोबत ओळखपत्र पुरावा

रेशन कार्ड (शिधापत्रिका) मध्ये युनिट वाढ करणेसाठी

१.लहान मुलांचे नाव वाढविण्यासाठी मुलांचे जन्म दाखले, शाळेतील बोनाफाईड दाखल्याची सांक्षाकित प्रत
२.पत्नीचे नाव वाढविण्यासाठी माहेरच्या कार्डातून नाव कमी केलेबाबतचा तहसीलदार किंवा परिमंडळ अधिकारी यांचा दाखला दाखल व लग्न पत्रिका किंवा विवाह नोंदणी प्रमाणपत्र
३.मोठ्या व्यक्तींचे नाव वाढविण्यासाठी पूर्वीच्या कार्डातून नाव कमी केलेबाबतचा दाखला

रेशन कार्ड (शिधापत्रिका) मधील युनिट कमी करणेसाठी

१.मुलीचे लग्न झाले असल्यास लग्नपत्रिका जोडून नाव कमी करण्याचा भरलेला अर्ज
२.मयत असल्यास मयत दाखला
३.परगावी जात असल्यास मूळ कार्ड व नाव कमी करण्याचा अर्ज
४.अर्जासोबत ओळखपत्र पुरावा.

रेशन कार्ड (शिधापत्रिका) मिळण्याचा कालावधी

१.नवीन रेशन कार्ड (शिधापत्रिका) मिळणेसाठी – १ महिना
२.दुबार रेशन कार्ड (शिधापत्रिका) मिळणेसाठी – ८ दिवस
३.रेशन कार्ड (शिधापत्रिका) नुतनीकरण – १ महिना
४.रेशन कार्ड (शिधापत्रिका) मधील नावात बदल व युनिटमध्ये वाढ अथवा घट असल्यास – ३ दिवस

 

1 reply

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.