कोथरूडमध्ये भरदिवसा किरकोळ कारणावरून पतीने केला पत्नीचा चाकूने वार करत खून

पुणे : पुण्याच्या उच्चभ्रू परिसरातील डहाणूकर कॉलनीत आज भरदिवसा किरकोळ कारणावरून पतीने पत्नीचा चाकूने वार करून खून केल्याची घटना घडली आहे. साडेतीन वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला आहे. त्यानंतर आरोपी पती पसार झाला असून अलंकार पोलीस त्याचा शोध घेत आहे.

कीर्ती रविकुमार पोटे (वय 43) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर पती रवी कुमार पोटे (वय 50) हा पसार झाला आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला
आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोटे दाम्पत्य कोथरुड येथील डहाणूकर कॉलनीत त्यांच्या 23 वर्षाच्या मुलीसोबत राहतात. पती रवी याला दारूचे व्यसन आहे. दरम्यान आज दुपारच्या सुमारास नवरा-बायकोमध्ये किरकोळ कारणावरून कडाक्याचे भांडण झाले होते. ते लंकार परिसरात असणाऱ्या एका रुग्णालयात आले होते. त्याठिकाणी पती रवी देखील आला. त्यानंतर त्यांची किरकोळ कारणावरून पुन्हा वादावादी झाली. या रागातून रवी याने पत्नी कीर्ती यांच्या छातीत चाकू खुपसला. तसेच चाकूने वार केले. यात कीर्ती या गंभीर जखमी झाल्या. त्यांना तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु डॉक्टरांनी मृत्यू झाल्याचे घोषित केले.

दरम्यान घटनेची माहिती मिळतात अलंकार पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घेतली. पण पती रवी हा तेथून पसार झाला. अधिक तपास आलंकार पोलिस करीत आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.