तुरीच्या शेताच्या जागी गांजाची शेती ; ६२ किलो गांजा जप्त

अहमदनगर : तुरीच्या शेताच्या जागी गांजाची शेती  करणाऱ्या ३ शेतकऱ्यांच्या शेतीवर धाडपाथर्डी- तालुक्यातील एकनाथवाडी शिवारातील डोंगरेवस्ती येथे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने टाकलेल्या धाडीत ६२ किलो वजनाचा गांजा जप्त करण्यात आला असून दोन शेतकऱ्याना ताब्यात घेण्यात आले आहे. तर एकाचा शोध घेण्यात येत आहे.

विष्णू अनिल डोंगरे,बाळासाहेब भानुदास खेडकर तसेच शहादेव रावसाहेब खेडकर असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नावे आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,एकनाथवाडी शिवारामध्ये काहीजण शेतामध्ये गांजाचे झाडे लावून राज्यात मोठ्या प्रमाणावर गांजा पुरवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली असता त्यांनी बुधवारी सायंकाळी चार वाजण्याच्या दरम्यान गावातील विष्णू अनिल डोंगरे,बाळासाहेब भानुदास खेडकर तसेच शहादेव रावसाहेब खेडकर यांच्या राहत्या घरी तसेच शेतावर धाड टाकून  ६ लाख २३ हजार ४४० रुपये किमतीचा ६२ किलो ३४५ ग़्रॉम वजनाचे सुका गांजा व  शेतात उभी असलेली गांज्याची झाडे मिळून आली.याबाबत माहिती मिळताच तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पथकाचे नेतृत्व शेवगाव पोलीस उपविभागीय अधिकारी सुदर्शन मुंडे यांनी केले रात्री उशिरा याबाबत जप्त मुद्देमाल याची मोजदाद करून फिर्याद दाखल करण्यात आली.दरम्यान दोन आरोपींना अटक करण्यात आली असून घटनेची माहिती मिळताच स्थानिक गावपुढाऱ्यांनी पोलीस ठाण्यात गर्दी केली होती. एकनाथ वाडीगावांमध्ये आणखी किती जण गांज्याची तस्करी करीत होते तसेच गांजा तस्करी मधला मुख्य सूत्रधार कोण याबाबत पोलीस तपास करत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.