मोशीत मटका जुगार अड्यावर पोलिसांचा छापा ; सात जणांना अटक

पिंपरी चिंचवड : अवैध मटका जुगार अड्यावर एमआयडीसी भोसरी पोलिसांनी छापा मारला. त्यात पोलिसांनी सात जणांना अटक केली असून त्यांच्याकडून एक लाख 66 हजार 320 रुपये किमतीचे साहित्य जप्त केले आहे. ही कारवाई बोराडेवाडी, मोशी येथील संजय गांधीनगर झोपडपट्टी येथे करण्यात आली.

सोहेल अखिल शेख (वय 27, रा. वल्लभनगर, पिंपरी), सतीश बारकराव लोखंडे (वय 30, रा. बोराडेवाडी, मोशी), विशाल तुकाराम गायकवाड (वय 23, रा. काळेवाडी, पिंपरी), राहुल चांगदेव साळवे (वय 20, रा. बोराडेवाडी, मोशी), भारत सुभाष सुधारे (वय 40, रा. बोराडेवाडी मोशी), शेख (वय 32, रा. आदर्शनगर, मोशी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस शिपाई स्वप्नील बाळासाहेब लांडगे यांनी एमआयडीसी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोराडेवाडी मोशी येथील संजय गांधीनगर झोपडपट्टी येथे एका पत्र्याच्या शेडमध्ये मटका जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा मारून एक लाख 66 हजार 320 रुपयांची रोकड आणि जुगाराचे साहित्य जप्त केले. तसेच सात जणांना अटक केली. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.