एटीएम कार्ड क्लोनिंग करत पैसे काढणार्या टोळीतील दोघांना नाशिकमधून अटक
पुणे : एटीएम कार्ड क्लोनिंग करुन बनावट कार्डद्वारे पैसे काढणाऱ्या आंतरजिल्हा टोळीतील दोघांना सायबर पोलिसांनी नाशिक येथून अटक केली. त्यांच्याकडून ३५९ बनावट तयार केलेले एटीएम कार्ड, १३ एटीएम स्कीमर डिव्हाईस, १२ डिजिटल मायक्रो कॅमेरा, २ वॉकी टॉकी, चार्जर, हेडफोन, १५ मायक्रो बॅटरी व त्याचे मॅकनिझम, ५० डाटा केबल, ४ लॅपटॉप चार्जर, डाटा केबल, ११ सॉफ्टवेअर मायक्रो सीडीज, ११ स्कीमर लावण्याच्या लहान बॅटरीज, एक मोबाईल, ४ इलेक्ट्रॉनिक सर्किट, ९ सर्किट बॅटरी, एक बनावट एटीएम कार्ड प्रिंट करण्यासाठी लागणार कल प्रिंटर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मोहम्मद अकिल आदिल भोरनिया (वय ३७) आणि मोहम्मद फैजान फारुख छत्रीवला (वय ३७, दोघेही रा.डोंगरी, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. त्यांना १४ डिसेंबर पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. डेनिस मायकल (वय ३२,रा. हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे.
मायकल यांच्या बँकखात्यातून ३० नोव्हेंबरला नाशिक येथील एटीएम सेंटर वरून १० ट्रानझाक्शन करून १ लाख रुपये काढण्यात आले. याबाबत त्यांनी सायबर पोलिसांकडे तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी तपास करीत २०० ते २२५ तक्रारींचे विश्लेषण करून आरोपींचा माग काढला. आरोपी नाशिक येथे असल्याचे समजले. त्यानुसार पुणे पोलिसांचे पथक नाशिकमध्ये आले. पोलिसांनी सापळा रचत दोघांना ताब्यात घेतले.त्यांच्याकडून ३५९ बनावट तयार केलेले एटीएम कार्ड, १३ एटीएम स्कीमर डिव्हाईस, १२ डिजिटल मायक्रो कॅमेरा, २ वॉकी टॉकी, चार्जर, हेडफोन, १५ मायक्रो बॅटरी व त्याचे मॅकनिझम, ५० डाटा केबल, ४ लॅपटॉप चार्जर, डाटा केबल, ११ सॉफ्टवेअर मायक्रो सीडीज, ११ स्कीमर लावण्याच्या लहान बॅटरीज, एक मोबाईल, ४ इलेक्ट्रॉनिक सर्किट, ९ सर्किट बॅटरी, एक बनावट एटीएम कार्ड प्रिंट करण्यासाठी लागणार कल प्रिंटर असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मोहम्मद छत्रीवाला आणि साथीदाराने मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, हिमाचल प्रदेश, हैदराबाद, गुजरात याठिकाणी गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले आहे. मागील तीन वर्षापासून तो फरार आहे. गुन्हा केल्यानंतर तो नेपाळ मार्गे दोन वर्षे दुबई मध्ये पळून गेला. डिसेंबर २०१९ मध्ये तो हिंदुस्थानात परत आला होता. त्यानंतर त्याने पुन्हा सायबर गुन्हे सुरू केले. इलेक्ट्रॉनिक डिप्लोमा पर्यंत त्याचे शिक्षण झाले असून दुसरा आरोपी अल्पशिक्षित आहे.
सह आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे, अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, उपआयुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांच्या पथकातील उपनिरीक्षक अमित गोरे, संदेश कर्णे, अस्लम अत्तार, शिरीष गावडे, नितीन चांदणे यांच्या पथकाने ही कारवाई केली.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!