नांदेडवरून पुण्यात येत दुचाकी चोरी करणार्या टोळीला वानवडी पोलिसांकडून अटक

पुणे :  नांदेडवरून पुण्यात येत विविध भागातून दुचाकी चोरल्यानंतर त्या इतर जिल्ह्यात विक्री करणाऱ्या टोळीला वानवडी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून तबल 23 वाहने जप्त करत साडे लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. तिघांना अटक करत दोन अल्पवयीन ताब्यात घेतले आहेत.

गौस मीरासाहेब शेख (वय 19, रा. नांदेड), रशिद मेहबूब शेख (वय 20) व शाहरुख पाशामिया शेख (वय 21) अशी अटक करण्यात आलेल्याची नावे आहेत.

शहरात वाहन चोऱ्या आणि घरफोड्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. त्या रोखण्यासाठी पोलीस कठोर प्रयत्न करत आहेत. मात्र, अद्याप तरी या घटना थांबत नसल्याचे दिसत आहे. दरम्यान, वानवडी पोलीस हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी कर्मचारी सुदर्शन बोरावके आणि शिरीष गोसावी यांना बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, काही तरुण पुण्यात येऊन दुचाकी चोरतात वाट्या दुचाकी इतर जिल्ह्यात.विकतात. या माहितीची खात्रीपूर्वक तपासणी केली. त्यानंतर या तरुणाचा शोध सुरू केला. यावेळी तिघेही नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुक्यातील बाराली गावचे असल्याचे समजले. त्यानंतर वानवडी पोलिसांच्या एका टीमने बाराली गावात जाऊन या तिघांना पकडले. तर त्यांचे दोन अल्पवयीन साथीदार देखील ताब्यात घेतले आहेत.

त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी शहरातील विविध भागातून दुचाकी चोरल्या असल्याचे सांगितले. तसेच या दुचाकी वेगवेगळ्या ठिकाणी नेहून विक्री केल्या असल्याची माहिती दिली. त्यांच्याकडून 9 लाख 69 हजार रुपयांच्या 23 दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. आरोपी हे मौजमजेसाठी दुचाकी चोऱ्या करत असल्याचे सांगितले. चोरीच्या पैशातून ते चैन करत होते. यातील गौस शेख व रहीद शेख हे पुण्यातील व ग्रामीण पोलीस दलातील चोरीच्या गुन्ह्यात पाहिजे आरोपी आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.