पिंपरी चिंचवडमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार, तीन जणावर गुन्हा दाखल
पिंपरी चिंचवड : दोन महिलांनी अल्पवयीन मुलीला फूस लावून अनैतिक कृत्यासाठी नेले. तिच्यासोबत एका तरुणाने लैंगिक अत्याचार केले. त्यात ती मुलगी गर्भवती राहिली. हा प्रकार मार्च ते सप्टेंबर 2020 या कालावधीत चिंचवड येथे घडला.याप्रकरणी तीन जणावर गुन्हा दाखल दाखल करण्यात आला आहे.
सचिन पारधी उर्फ काळ्या (वय 25, रा.दापोडी),आफरिन शेख (वय 25, रा.दापोडी), अनिता उर्फ ताई तिपाले (वय 25, रा. चिंचवड) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.याप्रकरणी रामकरण वर्मा, वय ४५ वर्षे, रा. सी/ओ अजय वर्मा महात्मा फुलेनगर, मराठी शाळेच्या दापोडी पुणे मुळ रा. ग्राम महूलखनपूर जि. राज्य उत्तरप्रदेश. मागे, बस्ती) यानी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी महिला आफरिन आणि अनिता या दोघींनी पीडित अल्पवयीन मुलीला फूस लावून अनैतिक कृत्यासाठी नेले. अल्पवयीन मुलीवर आरोपी सचिन याने वेळोवेळी लैंगिक अत्याचार केला. त्यात ती अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली. त्यानंतर हा प्रकार उघडकीस आला असून याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!