पुण्यातील जांभूळवाडीत दोन गटात झालेल्या वादातुन हवेत गोळीबार

पुणे : जांभूळवाडीत दोन गटात झालेल्या वादातुन अज्ञातांनी हवेत गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर तणावाचे वातावरण पसरले असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कात्रजच्या जांभूळवाडी रस्त्यावर शनीनगर आहे. गुरुवारी दुपारी तेथे काही मुलांचे वाद झाले होते. हे वाद मोठ्या प्रमाणात वाढले होते. पण ते नंतर मिटवण्यात आले. मात्र अचानक शनीनगरमध्ये येऊन काही जणांनी राडा घातला. त्यातील एकाने हवेत 3 फायर केल्याची माहिती आहे.

मात्र अचानक झालेल्या गोळीबारानंतर परिसर हादरून गेला आहे. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.