पूर्ववैमनस्यातून औंध हॉस्पिटलच्या आवारात तरुणाचा लोखंडी गजाने डोक्यात मारून निघृण खुन करणाऱ्या आरोपींना गुन्हे शाखेकडून ८ तासात अटक
पिंपरी चिंचवड : पूर्ववैमनस्यातून दोघांनी मिळून एका तरुणाचा लोखंडी गजाने डोक्यात मारून खून केला. ही घटना गुरुवारी (दि. 10) रात्री दहा वाजता औंध रुग्णालयाच्या समोर घडली. घटनेनंतर अवघ्या आठ तासात पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट पाचने दोन्ही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.
अक्षय अशोक नाईक (वय 23, रा. सर्वैट क्वार्टर, सांगवी फाटा, औंध), विक्रम उर्फ बिकू श्रीकेसरीन सिंग (वय 18, रा. बोपोडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. शेखर मनोहर चंडाले (वय 27, रा. नवी सांगवी) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गोविंद केडाशिवा वाघेला (वय 50, रा. सर्व्हन्ट क्वार्टर, औंध हॉस्पिटल, नवी सांगवी) यांनी सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तरुण शेखर आणि आरोपी यांचे मागील काही दिवसांपूर्वी किरकोळ कारणांवरून भांडण झाले होते. त्या भांडणाचा राग आरोपींच्या मनात होता. गुरुवारी रात्री दहा वाजताच्या सुमारास शेखर औंध हॉस्पिटल समोरील पार्किंगजवळ असलेल्या एका झाडाजवळ थांबला होता. त्यावेळी आरोपींनी शेखरच्या डोक्यात लोखंडी गजाने मारून त्याचा खून केला. घटनेनंतर आरोपी पसार झाले.
सांगवी पोलीस आणि गुन्हे शाखा युनिट चारच्या पोलिसांनी घटनेचा समांतर तपास सुरु केला. आरोपी खून केल्यानंतर फोन बंद करून पळून गेले होते.त्यावेळी पोलिसांनी आरोपींच्या मित्रांची माहिती काढत मित्रांच्या मदतीने आरोपी गुन्हा केल्या नंतर लपुन बसण्याची शक्यता असलेली सर्व ठिकाणे रात्रीतुन माहिती काढली. दरम्यान आरोपी आंबेडकर चौक, भाऊ पाटील रोड, बोपोडी येथे नाल्याच्या कडेला लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना नाल्याजवळ सापळा लावून अटक केली.
मयत हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्यावर सांगवी पोलीस ठाण्यात मारामारीच्या एक गुन्हा दाखल आहे.सदर आरोपींना पुढील कारवाई साठी सांगवी पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास सांगवी पोलीस ठाणे करीत आहे. तसेच इतर आरोपींचा शोध सुरु आहे.
ही कारवाई पोलीस आयुक्त आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त राजाराम पाटील (गुन्हे) यांच्या मार्गदर्शनाखालील गुन्हे शाखा युनिट चारचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रसाद गोकुळे, सहायक पोलीस निरीक्षक अंबरिष देशमुख, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक धर्मराज आवटे, कर्मचारी प्रविण दळे, नारायण जाधव, संजय गवारे, दादाभाऊ पवार, अदिनाथ मिसाळ, संतोष असवले, तुषार शेटे, लक्ष्मण आढारी, मो, गौस नदाफ, वासुदेव मुंडे, शावरसिध्द पांढरे, प्रशांत सैद, सुनिल गुट्टे, तुषार काळे, सुरेश जायभाये. अजिनाथ ऑबासे, धनाजी शिंदे, सुखदेव गावंडे, गोंविद चव्हाण, अतुल लोखंडे, नागेश माळी, राजेंद्र शेटे यांनी केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!