मावळात कम्बरेला गावठी पिस्तुल लावून फिरणाऱ्या तरुणाला अटक ; १ गावठी बनावटीचे पिस्तुल आणि एक जिवंत काडतुस जप्त
मावळ : कम्बरेला गावठी पिस्तुल लावून फिरणाऱ्या तरुणाला आणि त्याला पिस्तूल पुरवणारा अश्या दोघांना पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे.त्याच्याकडून ५० हजार रुपये किंमतीचे एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तुल मॅगजिन सह १०० रुपये किंमतीचे एक जिवंत काडतुस आणि १० हजार रुपये किमतीचा एक ओपो कंपनीचा मोबाईल असा एकूण ६० हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
नवनाथ राजू देवकर (वय २३ वर्षे रा वेहेरगाव ता मावळ जिल्हा पुणे) राहुल बरकू मांडुळे (वय २३ रा थोरण ता मावळ जिल्हा पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (दि. ११) रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पुणे- मुंबई रोडवर पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, मौजे कार्ला ता मावळ येथील एकविरा देवी मंदिर फाटा येथे आरोपी नवनाथ हा आपल्या कम्बरेला गावठी पिस्तुल लावून उभा आहे. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. त्याला ताब्यात घेऊन त्याची अंग झडती घेतली असता त्याच्याकडे एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तुल मॅगजिन आढळून आले.
त्याच्याकडून ५० हजार रुपये किंमतीचे एक लोखंडी गावठी बनावटीचे पिस्तुल मॅगजिन सह १०० रुपये किंमतीचे एक जिवंत काडतुस आणि १० हजार रुपये किमतीचा एक ओपो कंपनीचा मोबाईल असा एकूण ६० हजार १०० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्याच्याकडे पोलिसांनी अधिक चोकशी करत सदर हत्यार कोणाकडून आणले विचारले असता त्याने सदर हत्यार आरोपी राहुल याच्याकडून घेतल्याचे सांगितले.त्यानुसार त्यास ताब्यात घेऊन दोघांविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दोन्ही आरोपींना मुद्देमाल सह पुढील तपास कामी लोणावळा ग्रामीण पोलिस स्टेशन च्या ताब्यात दिले आहे .
सदरची कारवाई ही पोलिस अधिक्षक अभिनव देशमुुख, अप्पर पोलिस अधिक्षक विवेक पाटील,सहा.पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय अधिकारी नवनीत कावत यांच्या मार्गदर्शनाखाली.स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक पद्माकर घनवट, सहा. पोलिस निरीक्षक पृथ्वीराज ताटे, सहा.फौजदार विजय पाटील, सहा.फौजदार शब्बीर पठाण, पो हवा प्रकाश वाघमारे,पो हवा.सुनिल जावळे, पो हवा सुनील वाणी, पो हवा सचिन गायकवाड, पो हवा.विद्याधर निचित,पो ना गुरू जाधव स्था गुन्हे शाखा पुणे ग्रामीण यांनी केली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!