कोल्हापूर हादरले ! विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार
कोल्हापूर : विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची धक्कादायक घटना कोल्हापूरच्या पन्हाळा तालुक्यातील साखरवाडी इथली ही घटना आहे. यामुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे. या प्रकरणात पोलीस तपास करत असल्याची माहिती देण्यात आली आहे.याप्रकरणी कोडोली पोलीस ठाण्यात एका अल्पवयीनसह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अत्याचार करणाऱ्यांमध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश असल्याचं सांगण्यात येत आहे. ही विवाहित महिला दीड वर्षांच्या मुलीला घेऊन शेजारील घरात गप्पा मारण्यासाठी गेली असता तिच्यासोबत हा भयंकर प्रकार घडला. घरात कोणीही महिला नसल्याचं लक्षात आलं. पण तोच घरातील संशयित आरोपींनी तिचे हात खाटेला बांधून तिच्यावर अत्याचार केल्याचं समोर आलं आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती देण्यात आली आहे. तर विवाहितेवर बलात्कार करणाऱ्यांमध्ये अल्पवयीन मुलगाही असल्याने नागरिकांमध्ये संतापाचं वातावरण आहे.
या घटनेचा कोडोली पोलीस तपास करत असून पीडित महिलेला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असल्याचं सांगण्यात आहे. सुरक्षेच्या दृष्टीने त्यांच्या वैद्यकीय चाचण्याही करणं आवश्यक आहे. दरम्यान, त्यांची दीड वर्षांची मुलगी सुखरूप आहे. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत असून घरातील इतरांची चौकशी करत असल्याचं माहिती देण्यात आली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!