गांजा तसेच बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या महिलेला अटक, ५ लाख ३३ हजाराचा मुद्देमाल जप्त

पिंपरी चिंचवड : गांजा तसेच बेकायदेशीर दारू विक्री करणाऱ्या महिलेवर पिंपरी चिंचवड सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकून एका महिलेला अटक केली आहे.तिच्याकडून पाच लाख 33 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.अंबिका मारुती गरुड (वय 55, रा. आळंदी, ता.खेड) असे ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपी महिलेचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,सामाजिक सुरक्षा विभाग आळंदी परिसरात गस्त घालत असताना एक महिला अवैध गांजा व दारूची विक्री करत आल्याची माहिती पथकाला मिळाली.त्यानुसार पोलिसांनी वेषांतर करून व दोन वेगवेगळ्या टीम तयार करून आळंदीतील धुंडरे आळी येथे सापळा रचून महिलेला ताब्यात घेतले.

तिच्या जवळून ४ लाख ३ हजार ९०४ रुपये किमतीचा हिरवट तापकीर रंगाचा पाने फुले बिया-बोंडे असलेला २७ किलो ४४० ग्रॅम वजनाचा गांजाा , १ लाख १२ हजार ९०० रुपयेेेेेेेे रोख रक्कम, १२ हजार ७४२ रुपयेे किमतीच्या देशी-विदेशी कंपनीच्या दारुच्या तसेच बियरच्या बाटल्या व साडे तीन हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण पाच लाख 33 हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

अटक केलेल्या महिलेवर एन.डी.पी.एस.अॅक्ट कलम ८ (क) सह २० (ब), (ii), (क) तसेच महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ कलम ६७ (ई) प्रमाणे दाखल करण्यात आला असून पुढील तपास आळंदी पोलीस करत आहेत.

सदर कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त  रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त सुधीर हिरेमठ, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीमती प्रेरणा कट्टे यांचे मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सपोनि निलेश वाघमारे, सपोनि डॉ. अशोक डोंगरे, पोहवा. संदिप गवारी, पोना दिपक साबळे, पोना अनिल महाजन, मपोना वैष्णवी गावडे, मपोना संगीता जाधव, पो.शि. योगेश तिडके यांनी केली आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.