चुलत्याच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्महत्या

पिंपरी चिंचवड :  सुट्टीसाठी औरंगाबाद येथील आपल्या काकाकडे गेलेल्या अल्पवयीन पुतणीचा चुलत्याने विनयभंग केला.तसेच तिला वारंवार अश्लिल मेसेज पाठवले.  या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीने आत्महत्या केली. ही घटना इंद्रायणीनगर, भोसरी येथे एप्रिल 2018 ते 6 सप्टेंबर 2020 या कालावधीत घडली. या प्रकरणी शुक्रवारी (दि. 11) भोसरी पोलीस ठाण्यात विनयभंग व आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गौरव सोपान नारखेडे (वय ३० वर्षे, रा. एन/९, एल १२३/४, सीडको, कलावती लॉन्स समोर, औरंगाबाद) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी मृत मुलीच्या आईने भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,एप्रिल 2018 मध्ये.पीडित मुलगी औरंगाबाद येथील काकाकडे.सुट्टीसाठी गेली होती. तेंव्हा काकाने पुतणीला छेडले म्हणून ती लगेचच ती भोसरी इंद्रायणीगरमधील आपल्या घरी परतली होती. मात्र काकाने तरी पिच्छा सोडला नाही. त्याने वारंवार.अश्लील मेसेज करत त्रास देणे सुरुच ठेवले. याच त्रासाला ती कंटाळून तीने राहत्या घराच्या गॅलरीतून उडी घेत आत्महत्या केली. या प्रकरणी भोसरी पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.