पिंपरी चिंचवडमध्ये लाखो रुपयांचा गुटखा जप्त
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी भोसरी, हिंजवडी आणि वाकड परिसरात गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ विक्रीसाठी आलेल्या चार जणांवर गुन्हा दाखल करत त्यांच्याकडून सहा लाख ७८ हजार १६४ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
एमआयडीसी भोसरी पोलिसांनी गणेश दलाराम चौधरी (वय २०), सुरेश दलाराम चौधरी (वय ३४, दोघे रा. गणेशनगर, भोसरी) या दोघांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्याकडून ९ हजार २९३ रुपये किमतीचा प्रतिबंधित गुटखा आणि दीड लाख रुपयांची कार असा एकूण एक लाख ५९ हजार २९३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एमआयडीसी भोसरी पोलीस तपास करीत आहेत.
हिंजवडी पोलिसांनी गुटखा विक्रीसाठी निघालेल्या एकाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून दोन लाख ७३ हजार ६८५ रुपयांचा गुटखा आणि एक लाख ७५ हजारांचे एक वाहन जप्त केले. पुनाराम मुळाराम सैंचा (वय ४१, रा. बावधन) असे ताब्यात घेलेल्या व्यक्तीचे नाव आहे. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.
वाकड पोलिसांनी लिंक रोड, रहाटणी येथील तापकीर मळा चौकात एकाला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २५ हजार १८६ रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थ आणि ४५ हजारांचे वाहन असा एकूण ७० हजार १८६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. सुनील लल्लू कुमार (वय ३६, रा. नढेनगर, काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!