पिंपरी चिंचवड शहरात दिवसभरात १८० नवीन रुग्ण, २६७ रुग्णांना डिस्चार्ज

पिंपरी चिंचवड : शहरातील कोरोणा पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या परत वाढत आहे. आज दिवसभरात शहरात १८० नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत त्यामुळे शहरातील कोरोनाबधिताची संख्या ९४ हजार २६८ वर पोहचली आहे. तर आज २६७ नागरिक या आजारातून मुक्त झाले. दरम्यान आज २ रुग्णाचा कोरोणामुळे मृत्यू झाला.

आज शहरात दिवसभरात शहरातील शहरातील शहरात १८० जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे शहरातील कोरणाबधिताची संख्या ९४,२६८ झाली आहे.त्यात दिलासादायक बाब म्हणजे शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण जास्त आहे. आज शहरातील २६७ रुग्णांची पुन्हा टेस्ट घेण्यात आली. त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आज अखेर ९१,०३२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान आज २ रुग्णाचा कोरोणामुळे मृत्यू झाला त्यामुळे आतापर्यंत शहरातील १७१६ जणांचा तर शहराबाहेरील परंतु महापालिका रूग्णालयात उपचार घेणाऱ्या ६९५ अशा २४११ जणांचा कोरोणामुळे मृत्यू झाला आहे.

शहरात आजपर्यंत ९४,२६८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यातील ९१,०३२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शहरातील १७१६ जणांचा आजपर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.