पुणे शहरातील सर्व शाळा ३ जानेवारीपर्यंत बंदच राहणार, महापौरांची घोषणा

पुणे : शहरातील महापालिका आणि खासगी शाळा येत्या ३ जानेवारीपर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला असून पाल्यांचे आरोग्य आणि पालकांचा हमीपत्रांना मिळालेला अत्यल्प प्रतिसाद या पार्श्वभूमीवर शाळा बंदचा निर्णय घेतला आहे’, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

पुणे शहरातील शाळा १४ डिसेंबरपासून सुरु होणार होत्या. मात्र महापौर मोहोळ यांनी पालक संघटना चर्चा करत आणि कोरोनाची सद्यस्थिती लक्षात घेऊन शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतचे लेखी आदेशही महापालिका प्रशासनाने जारी केले आहेत. गेल्यावेळी शाळा सुरु करण्यासंदर्भात पालकांचे अवघे ५ टक्के हमीपत्र जमा झाले होते. यावेळीही हीच स्थिती पाहायला मिळत आहे.

महापौर मोहोळ म्हणाले,आपल्या पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळा ३ जानेवारी २०२१ पर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय आपण घेतला आहे. कोरोना संसर्ग नियंत्रणात असला तरी विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेता, आपण हा निर्णय घेतला आहे. शाळा सुरू करण्यासाठी पालकांचे आवश्यक असलेल्या हमीपत्रांना यावेळेसही अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. तसेच पाल्यांचे आरोग्य हाही महत्त्वाचा विषय असून याबाबत सर्व घटकांशी चर्चा करुन आपण निर्णय घेतला आहे. येत्या ३ जानेवारीच्या आधी कोरोना संसर्ग आणि इतर बाबींचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेणार आहोत’.

पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व शाळा ३ जानेवारी २०२१ पर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय आपण घेतला आहे. कोरोना संसर्ग नियंत्रणात असला तरी विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेता, आपण हा निर्णय घेतला आहे. शाळा सुरू करण्यासाठी पालकांचे आवश्यक असलेल्या हमीपत्रांना यावेळेसही अत्यल्प प्रतिसाद मिळाला आहे. ही देखील शाळा बंद ठेवण्याच्या निर्णयाची पार्श्वभूमी आहे.

याआधी पुणे महापालिकेनं 23 नोव्हेंबरपासून शाळा उघडण्याची घोषणा केली होती. पुणे पालिका क्षेत्रातील इयत्ता नववी ते 12 वीचे वर्ग 23 नोव्हेंबरपासून सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले होते.  पण, कोरोनाची परिस्थिती आणि रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पुणे महापालिकेनं आपला निर्णय मागे घेतला आहे. या आदेशाची आजपासूनच अंमलबाजवणी करण्याची सूचनाही देण्यात आली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.