पुणे शहरात दिवसभरात ३१७ नवीन रुग्ण, २५४ रुग्णांना डिस्चार्ज
पुणे : मागील काही दिवसांपासून पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत परत वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे.आज दिवसभरात शहरातील ३१७ नवीन कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत त्यामुळे शहरातील कोरोनाबधिताची संख्या १,७३,४०२वर पोहचली आहे. तर आज २५४ नागरिक या आजारातून मुक्त झाले. . दरम्यान आज ६ जणांचा कोरोना मुळे मृत्यू झाला होता.
पुण्यात आज दिवसभरात ३१७ नवीन कोरोनाबाधित रुग्ण रुग्ण आढळले आहेत. आजच्या रुग्णांसह पुणे शहरातील एकूण संख्या आता १,७३,७१९ इतकी झाली आहे. तर, आज कोरोनावर उपचार घेणार्या २५४ रुग्णांची आज पुन्हा टेस्ट घेण्यात आली. त्या सर्वांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने, त्यांना घरी सोडण्यात आले असून अखेर १,६४,०३३ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत, अशी माहिती पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागामार्फत देण्यात आली.
पुणे शहरात उपचार घेणाऱ्या ५ हजार १५० रुग्णांपैकी ३८३ गंभीर रुग्ण असून त्यात २२८ जण व्हेंटिलेटरवर आहेत. तर आज दिवसभरात दिवसभरात कोरोनामुळे ६ रुग्णांचा मृत्यू झाला. यामुळे आज अखेर एकूण मृत रुग्णांची संख्या ४५३६ वर पोहोचली आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!