सराईत गुन्हेगार शुभम कवठेकर टोळीवर मोक्काची कारवाई

पिंपरी चिंचवड :वाकड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सराईत गुन्हेगार शुभम कवठेकर टोळीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी मोक्काची कारवाई करण्यात आली आहे.शुभम कवठेकर यांच्यासह सात साथीदारांवर ही कारवाई करण्यात आली आहे. परिसरात वर्चस्वासाठी आणि आर्थिक फायद्यासाठी ही टोळी गुन्हेगारी कुरापती करत असल्याने पोलिसांनी त्यांच्यावर मोक्काची कारवाई केली.

(१) शुभम निवृत्ती कवठेकर (वय २३ रा. बी/११ इंदिरानगर, गणपती मंदिरा जवळ, बिबवेवाडी, पुणे, (टोळीप्रमुख)), दिपक नाथा मिसाळ (वय २३ रा. रामजाळ निवास, स्मशानभुमी जवळ, काळेवाडी, पुणे ),आकाश महादेव कांबळे (वय २२
वर्षे, रा.के/ऑफ गुलाब भालेराव आशिर्वाद कॉलनी, रहाटणी, पुणे), कैलास हरिभाऊ वंजारी ( वय १९ वर्षे,रा. भाजी मंडई जवळ, रहाटणी, पुणे ) मंगेश मोतीराम सपकाळ, (वय २३ वर्षे, रा. रामजाळ निवास, स्मशानभुमी जवळ, काळेवाडी, पुणे), सनी गौतम गवारे, वय १९ वर्षे, रा.जीवन ज्योती हॉस्पी. जवळ, गजानन नगर सी. कॉलनी, रहाटणीफाटा पुणे),  राहुल हिवराज उके (वय १६ वर्षे, रा जयमल्हार कॉलनी ने ५, थेरगांव पुणे, (विधीसंघर्षग्रस्त)),सुरज बाळु पाटोळे (वय १६ वर्षे, रा केशवनगर पिपळे सौदागर पुणे(विधीसंघर्षग्रस्त)) अशी मोक्काची कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.

आरोपी वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी टोळी बनवून वैयक्तीतरित्या अथवा संघटितपणे दरोडा टाकणे, शस्त्रांचा धाक दाखवुन खंडणी घेणे, खूनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत यासारखे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाल्याने वाकडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर यांनी उपायुक्त आनंद भोईटे यांच्या मार्फत आरोपींच्या विरोधात मोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांच्याकडे पाठवला होता.

उपायुक्त (गुन्हे) सुधीर हिरेमठ, सहाय्यक आयुक्त श्रीमती. प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पीसीबी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजकुमार शिंदे यांनी त्या प्रस्तावा मधील कागदपत्रांची छाननी करून हा प्रस्ताव अपर आयुक्तांकडे पाठवला. अपर आयुक्त रामनाथ पोकळे यांनी शुक्रवारी (दि. ११) मोका अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले.

ही कारवाई पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त सुधीर हिरेमठ,उपायुक्त आनंद भोईटे, सहाय्यक आयुक्त श्रीमती. प्रेरणा कट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजकुमार शिंदे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विवेक मुगळीकर तसेच कर्मचारी पोलीस हवालदार सचिनच चव्हाण , पोलीस हवालदार सुहास पाटोळे यांचे पथकाने केली आहे

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.