स्पा सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, तीन महिलांची सुटका

पिंपरी चिंचवड : अवैद्यरित्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या ‘स्पा’ मसाज सेंटरवर छापा टाकून निगडी पोलिसांनी ०३ मुलीची सुटका केली आहे. ही कारवाई चिंचवडमधील अजिंठानगर येथे आज (शनिवार,दि.12) करण्यात आली.या कारवाईत ‘स्पा’ च्या मालकाला अटक करण्यात आले आहे.

तानाजी उर्फ राजेश व्यकंट कानुरे (वय 32, रा.रुपीनगर, निगडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी स्पा मालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी अजिंठानगर येथे स्पा सेंटरच्या नावाखाली सेंटरमध्ये वेश्याव्यवसाय चालवत होता. याबाबत निगडी पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी स्पा सेंटरवर छापा टाकून मालकाला अटक केली व तीन पिडित मुलींची सुटका करण्यात आली.

ही कारवाई निगडी पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक गणेश जवादवाड, पोलीस उपनिरीक्षक महेंद्र आहेर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मच्छिंद्र घनवट, पोलीस हवालदार सतीश ढोले, पोलीस हवालदार परवीन पठाण, पोलीस शिपाई विनोद व्हनमाने, सोपान बोदवड, दीपक जाधव यांनी केली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.