जेष्ठ दांपत्याच्या घरी दरोडा घालणाऱ्या आरोपीना अवघ्या काही तासात अटक, कोथरूड पोलिसांची कामगिरी
पुणे : जेष्ठ दांपत्याचे खिडकीचे गज कापून बंगल्यात घुसून शस्त्राचा धाक दाखवून लूटल्याचा प्रकार गुरुवारी रात्री कोथरुडमध्ये घडला होता. या दरोड्याची तक्रार आल्यानंतर अवघ्या काही तासात दरोडेखोरांना पकडण्याची कामगिरी कोथरुड पोलिसांनी केली आहे. आरोपींमध्ये वृद्धांना व रुग्णांना परिचारिकांची सेवा पुरवणा-या एका संस्थेचा मालकही सामील असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे आणखी काही गुन्हे या टोळीकडून केले गेले असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
आकाश कांबळे (वय 22), दीपक सुगावे (वय 21), संदीप हांडे (वय 25),छगन जाधव (वय 48) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी 74 वर्षीय नागरिकाने फिर्याद दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी व त्यांच्या पत्नी हे दोघेच जय भवानी नगर येथे त्यांच्या बंगल्यात राहतात.त्यांचा मुलगा अमेरिकेत असतो, तर विवाहित मुलगी बावधन येथे राहते. दरम्यान त्याच्या देखभालीसाठी ते केअर टेकर ठेवतात. त्यांनी संदीप याला केअर टेकर म्हणून कामास ठेवले होते. काही वर्षे त्याने काम केले. मात्र दीड वर्षांपूर्वी त्याने येथील काम सोडले. त्यामुळे त्याला फिर्यादी यांची व त्यांच्या घराची पूर्ण माहिती होती. दरम्यान काल मध्यरात्री मध्यरात्री दीड ते दोन वाजण्याच्या सुमारास आरोपी संदीप व त्याचे दोन साथीदार हे गच्चीवर असलेल्या खिडकीचे गज कापून आत शिरले. त्यांच्याजवळ घातक शस्त्र होती.आत आल्यानंतर त्यांनी फिर्यादी यांच्या पत्नीच्या गळ्याला कोयता व धारधार शस्त्र लावत ‘आवज करने का, नहीं’ असे म्हणत त्यांना धमकावले. तसेच त्यांच्या हातावर वार करत त्यांना जखमी केले. त्यानंतर त्यांच्या बेडरूममध्ये असलेल्या कपाटातून रोकड आणि दागिने असा 11 लाख 52 हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर कोथरुड पोलिसांनी तात्काळ आरोपींचा शोध सुरू केला.
त्यानंतर पोलिसांनी आकाश कांबळेला पकडले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्याने इतर आरोपींची माहिती दिली. यानंतर तिघांना.पकडण्यात आले. चौकशीत संदीप हांडे हा पूर्वी फिर्यादी यांच्या घरी केअर टेकर म्हणून काम करत होता. तर गुन्ह्याचा मास्टर माईंड छगन जाधव असल्याचे समजले. त्यानेच संदीप हांडे याला केअर टेकर म्हणून फिर्यादी यांच्याकडे नोकरीस लावले होते. काल मध्यरात्री कोथरूडमधील पौड रस्त्यावरील बंगल्यात टोळीने जेष्ठ दाम्पत्याला कोयत्याचा धाक दाखवून 11 लाख 52 हजारांचा ऐवज.लुटून नेला होता. पोलिसांनी दीपक, संदीप आणि छगनला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी जेष्ठ दाम्पत्याच्या घरावर दरोडा टाकल्याची कबुली दिली.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, पोलीस उपायुक्त पौर्णिमा गायकवाड, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील तांबे, पोलीस निरीक्षक बाळासाहेब बडे, सहायक निरीक्षक आसाराम शेटे, पोलीस उपनिरीक्षक संतोष पाटील, दत्ता शिंदे, विलास ढोले, विलास जोरी, नलीन येरुणकर, सचिन कुदळे, विजय कांबळे, मनोज पवार, नितीन कानवडे, युवराज काळे, राहूल ढोबळे, प्रीतम निकाळजे, अजय सावंत, भास्कर बुचडे, विजय काकडे याच्या पथकाने केली. आरोपीची नर्सिंग केअर टेकरची कंपनी छगन जाधव हा गुन्ह्याचा मास्टर मा इंड असून त्याची पिंपरी चिंचवड भागात अजिंक्य नर्सिंग केअर टेकरची कंपनी आहे. तो जेष्ठ नागरिकांना केअर टेकर म्हणून मनुष्यबळ पुरवत असल्याचे समोर आले आहे.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!