अनैतिक संबंधातून खून , बेपत्ता तरुणाचा 14 महिन्यांनी सापडला मृतदेह
औरंगाबाद : मागील 14 महिन्यांपासून बेपत्ता असणाऱ्या अंमळनेर येथील 29 वर्षीय युवकाचा मृतदेह गंगापूर पोलिसांनी शनिवारी (दि.12) जेसीबीच्या साह्याने उकरुन काढला. या तरुणाचा अनैतिक संबंधातून खून झाल्याचे पोलिस तपासात उघड झाले असून या प्रकरणी पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे.
सचिन ज्ञानेश्वर पंडित आणि रवींद्र उर्फ प्पू कारभारी बुट्टे (दोघे रा. अंमळनेर, ता. गंगापूर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.याप्रकरणी पोलीस नाईक संदीप डमाळे दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमळनेर येथील गणेश दामोदर मिसाळ हा 5 ऑक्टोबर 2019 पासून बेपत्ता होता. गणेशचा पाच दिवस शोध घेतला मात्र तो सापडला नाही. अखेर 10 ऑक्टोबर 2019 रोजी गंगापूर पोलीस ठाण्यात गणेश बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली होती. तक्रार दाखल झाल्यापासून गंगापूर पोलीस या प्रकरणाचा शोध घेत होते.
दरम्यान, सचिन आणि रवींद्र यांना ताब्यात घेतले. तपासामध्ये सचिन याचे गावातील एका महिलेसोबत अनैतिक संबंध होते आणि मयत गणेश याला हे माहित होते. तसेच तो हे संबंध उघड करण्याची धमकी देत होता. याच कारणावरुन आरोपींनी कट रचून त्याचे अपहरण केले आणि दोरीने गळा आवळून खून केला. खून केल्यानंतर त्याचा मृतदेह अंमळनेर शिवारातील पाडुरंग गाडे यांच्या शेतात पूरल्याची माहिती समोर आली.
हि कारवाई पोलीस निरीक्षक मच्छिंद्र सुरवसे, सहायक पोलीस निरीक्षक प्रल्हाद मुंढे, पोलीस हेड कॉन्स्टेबल कैलास निंभोरकर, विजय भिल्ल, पोलीस नाईक संदीप डमाळे, गणेश खंडागळे, सोमनाथ मुरकूटे, लक्ष्मण पुरी, मनोज बेडवाल, गणेश लिपणे, दत्तात्रय गुंजाळ यांच्या पथकाने केली.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!