इनोव्हा गाडीतून मद्याची वाहतूक करणाऱ्या एकाला अटक,16 लाख 78 हजाराचा विदेशी मद्यसाठा जप्त

पुणे : इनोव्हा गाडीतून मद्याची वाहतूक करणाऱ्या एकाला बारामती शहर पोलिसांनी शनिवारी रात्री उशिराअटक केली आहे. त्याच्याकडून 16 लाख 78 हजाराचा विदेशी मद्यसाठा जप्त केला आहे. राहुल पोपट शिरसाट (रा. वंजारवाडी तालुका बारामती) असे आरोपीचे नाव आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, इंदापूर चौकात एका चारचाकी गाडीत मोठ्या प्रमाणावर मद्याचा साठा असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पोलिसांनी इंदापूर चौकात या चार चाकी गाडीची तपासणी केली असता मोठ्या प्रमाणावर विदेशी मद्यसाठा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी हा सर्व मद्यसाठा जप्त केला असून गाडीमध्ये असलेल्या राहुल शिरसाट याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास बारामती शहर पोलिस करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.