पुणे विभागातील 5 लाख 20 हजार 855 कोरोना बाधित रुग्णांना डिस्चार्ज – विभागीय आयुक्त सौरभ राव

पुणे : पुणे विभागातील 5 लाख 20 हजार 855 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोना बाधीत रुग्णांची संख्या 5 लाख 48 हजार 590 झाली आहे. तर ॲक्टीव रुग्ण संख्या 12 हजार 402 इतकी आहे. कोरोनाबाधीत एकुण 15 हजार 333 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृत्यूचे प्रमाण 2.79 टक्के आहे. पुणे विभागामध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.94 टक्के आहे, अशी माहिती विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी दिली.

पुणे जिल्हा

पुणे जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 3 लाख 51 हजार 584 रुग्णांपैकी 3 लाख 33 हजार 759 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण 9 हजार 305 आहे. कोरोनाबाधित एकूण 8 हजार 520 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यूचे प्रमाण 2.42 टक्के इतके आहे तर बरे होणा-या रुग्णांचे प्रमाण 94.93 टक्के आहे.

सातारा जिल्हा

सातारा जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 53 हजार 34 रुग्णांपैकी 50 हजार 174 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 116 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 744 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सोलापूर जिल्हा

सोलापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 473 रुग्णांपैकी 44 हजार 392 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 1 हजार 425 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 656 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

सांगली जिल्हा

सांगली जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 47 हजार 232 रुग्णांपैकी 45 हजार 125 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 385 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 722 रुग्णांचा मृत्यू झाला आहे

कोल्हापूर जिल्हा

कोल्हापूर जिल्हयातील कोरोना बाधीत एकूण 49 हजार 267 रुग्णांपैकी 47 हजार 405 रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. ॲक्टीव रुग्ण संख्या 171 आहे. कोरोनाबाधित एकूण 1 हजार 691 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

कालच्या रुग्णसंख्येच्या तुलनेत आज झालेली वाढ
कालच्या बाधीत रुग्ण संख्येच्या तुलनेत पुणे विभागात बाधीत रुग्णांच्या संख्येमध्ये 955 ने वाढ झाली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यात 761 , सातारा जिल्ह्यात 19, सोलापूर जिल्ह्यात 129, सांगली जिल्ह्यात 35 तर कोल्हापूर जिल्ह्यात 11 अशी रुग्ण संख्येमध्ये वाढ झालेली आहे.

कालच्या रुग्णसंख्येमध्ये बऱ्या होणा-या रुग्णांचे प्रमाण –

पुणे विभागामध्ये बऱ्या होणाऱ्या रुग्णांमध्ये एकूण 1 हजार 10 आहे. पुणे जिल्हयामध्ये 781, सातारा जिल्हयामध्ये 0, सोलापूर जिल्हयामध्ये 172, सांगली जिल्हयामध्ये 24 व कोल्हापूर जिल्हयामध्ये 33 रुग्णांचा समावेश आहे.

पुणे विभागातील सर्व्हेक्षण

आजपर्यत विभागामध्ये एकुण 30 लाख 57 हजार 359 नमून्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाला. प्राप्त अहवालांपैकी 5 लाख 48 हजार 590 नमून्यांचा अहवाल सकारात्मक (पॉझिटिव्ह) आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.