अंघोळ करतानाचा व्हिडिओ काढून अल्पवयीन मुलीवर नऊ महिने अत्याचार

श्रीगोंदे : मोबाईलमध्ये एका अल्पवयीन मुलीचे अंघोळ करतानाचे व्हिडिओ चित्रीकरण करून ते सगळीकडे प्रसारित करण्याची धमकी देत एकाने नऊ महिने संबंधित मुलीवर अत्याचार केल्याची धक्का दायक घटना श्रीगोंदा तालुक्यात घडली आहे.याप्रकरणी एका व्यक्तीवर पोलिस ठाण्यात पोक्‍सो, बलात्कार, विनयभंग अशा विविध कलमांनुसार गुन्हे दाखल करण्यात आला आहे.

रामदास रोहिदास मोरे (वय 38) असे गुन्हा दाखल केलेल्या आरोपीचे नाव असून तो पसार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीने एका अल्पवयीन मुलीचा अंघोळीचा व्हिडिओ तयार करून तो सगळीकडे प्रसारित करण्याची धमकी दिली होती. त्यातून दमबाजी करत त्याने मुलीवर तब्बल नऊ महिने वेळोवेळी अत्याचार केले.

काल (रविवारी) ही घटना उघडकीस आल्यानंतर पीडित मुलीच्या नातेवाइकांनी श्रीगोंदे पोलिस ठाण्यात धाव घेत मोरेविरोधात गुन्हा दाखल केला. सहायक पोलिस निरीक्षक विठ्ठल पाटील तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.