कर्ज देण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक; आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश
पुणे : कर्ज देण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीच्या दोघांना खडक पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दोन अलिशान कार, ४ मोबाईल असा मिळून ८० लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.
व्ही एम महमंद दाउद खान (वय २८ रा. चेन्नई ) आणि आर कार्तिक रवीकुमार (वय ३२ रा. चेन्नई) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.
व्यवसायायाठी २५ कोटींचे कर्ज देण्याच्या आमिषाने मार्केेेटयार्ड परिसरातील माने टॅक्स अॅड बिझनेस कन्सल्टन्सीची १ कोटी ५२ लाख ४५ हजारांची फसवणूक झाली होती. त्यानुसार खडक पोलिसांकडून गुन्ह्याचा तपास करण्यात येत होता. माहितीच्या आधारे पोलिसांनी खान आणि रवीकुमारला चैन्नईतून ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.
पोलीस उपायुक्त डॉ. प्रियंका नारनवरे, सहायक आयुक्त गजानन टोम्पे, वरिष्ठ निरीक्षक श्रीहरी बहिरट, पोलीस निरीक्षक हर्षवर्धन गाडे, सहायक निरीक्षक यशपाल सुर्यवंशी, बंटी कांबळे, समीर माळवदकर, अमेय रसाळ, संदीप पाटील, राहूल मोरे यांच्या पथकाने केली.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!