लग्नाचे आमिष दाखवून मेव्हणीवर वारंवार बलात्कार

पिंपरी चिंचवड : लग्नाचे आमिष दाखवून मेव्हणीवर वारंवार बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. ही घटना ऑगस्ट २०२० ते ११ डिसेंबर २०२० या कालावधीत बोहाडेवाडी, मोशी येथे घडली.

राहुल बबन भालेराव (वय २९, रा. कोरेगाव भीमा, ता. शिरूर) याला अटक करण्यात आली आहे.या प्रकरणी मेव्हणीने एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने मावस मेव्हणीसोबत तिच्या संमतीशिवाय संबंध ठेवले. मेव्हणीला लग्नाचे आमिष दाखविले आणि वेळोवेळी शरीरसंबंध ठेवले. या प्रकरणी पीडितेने ११ ऑगस्टला एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद नोंदविली.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.