अवैधरित्या दारु व बिअरची विक्री करणा-या कॉर्नर व्हेज नॉनव्हेज हॉटेलवर सामाजिक सुरक्षा पथकाचा छापा

पिंपरी चिंचवड : अवैधरित्या दारु व बिअरची विक्री करणा-या हॉटेल कॉर्नर व्हेज नॉनव्हेज’ या हॉटेलवर पिंपरी-चिंचवड सामाजिक सुरक्षा पथकाने छापा मारून हॉटेल मालका विरुध्द म्हाळुगे पोलीस ठाण्यात गुन्हाा दाखल करण्यात आला आहे. त्यांच्याकडून  रोख रक्कम, ओपो कंपनिचा अॅण्ड्राईड मोबाईल,  देशी-विदेशी दारूच्या तसेच बियरच्या बॉटल असा एकूण १ लाख ०२ हजार ५०६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

भुषण बेल्हेकर (रा. देहुगांव ता. हवेली जि. पुणे) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,रविवारी सामाजिक सुरक्षा पथकाचे पोलीस गस्त घालत होते. त्यावेळी पोलिसांना माहिती मिळाली की,देहुगांव ते येलवाडी जाणाऱ्या रस्त्यावर संत भागिरथीमाता चौक,येलवाडी ता. हवेली जि. पुणे येथे रोडलगत ‘हॉटेल कॉर्नर हेज नॉनव्हेज’ या हॉटेल मध्ये हॉटेलचा मालक हा विनापरवाना अवैधरित्या देशी विदेशी दारु व बिअरची विक्री करीत आहे

त्यानुसार पोलिसांनी हॉटेलवर छापा मारला. त्यामध्ये आरोपी ग्राहकांना हॉटेलमध्ये बसवून दारूची विक्री करताना आढळून आले. पोलिसांनी हॉटेलमधून ४८ हजार ५० रुपये रोख रक्कम, ४६ हजार ४५६ रुपये किमतीच्या देशी विदेशी दारूच्या तसेच बियरच्या बॉटल, ८ हजार रुपये किमतीचा ओपो कंपनिचा अॅण्ड्राईड मोबाईल असा एकूण १ लाख २ हजार ५०६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला

हॉटेलचे चालक मालक यांच्याविरुध्द  कलम १८८, २६९ महा.दारुबंदी कायदाकलम ६५(ई) साथीचा रोग अधिनियम १८९७ कलम ३, राष्ट्रीय आपत्ती अधिनियम २००५ चेकलम ५१ (ब), महा.कोवीड १९ उपाययोजना २०२० चेकलम ११ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास म्हाळुगे पोलीस चौकी करीत आहे.

सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उप-आयुक्त गुन्हे सुधिर हिरेमठ, सहा. पोलीस आयुक्त. प्रेरणा कट्टे,वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि सोळंके, पोना अनिल महाजन, पोना स्वप्निल खेतले, पोना संगीता जाधव, पोशि दिपक शिरसाट, पोशि योगेश तिडके, पोशि मारोतराव जाधव यांनी केली.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.