कारखान्यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांकडून अटक

पुणे : कात्रजमधील सुखसागर परिसरातील एका कारखान्यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या टोळीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून कोयते, मिरचीपूड, कटावणी, तीन दुचाकी, सहा मोबाईल असा 1 लाख 57 हजारांचा ऐवज जप्त
करण्यात आला.

प्रमोद शांताराम नाडे (वय २१), सुमित जालिंदर शेलार (वय 21 ), ओंकार हरिभाउ जाधव (वय २० ), सौरभ सुनील पायगुडे (वय २८), लोकेश लालचंद पगारे (वय २०, सर्व रा. इंदिरानगर) आणि आकाश बाजीराव खोपडे (वय २०, रा. बिबवेवाडी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे कर्मचारी हद्दीत गस्त घालत होते. त्यावेळी सुखसागरनगरमधील एका कारखान्यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत टोळी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून प्रमोद, सुमीत, ओंकार, सौरभ, लोकेश, आकाशला ताब्यात घेतले. त्यांच्याकडे कोयते, मिरचीपूड, कटावणी, तीन दुचाकी, सहा मोबाईल असा 1 लाख 57 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला.चौकशीत त्यांनी कारखान्यावर दरोडा टाकणार असल्याची कबुली दिली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.