निगडी मधील मॉलच्या स्पा सेंटरमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पर्दाफाश, पाच महिलांची सुटका

पिंपरी चिंचवड : अवैद्यरित्या वेश्याव्यवसाय करणाऱ्या ‘स्पा’ मसाज सेंटरवर छापा टाकून पिंपरी चिंचवड पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा विभाग पथकाने ०५ महिलांची सुटका आहे. ही कारवाई मुंबई-पुणे हायवे रोडवरील Inspiria मॉलमधील चौथ्या मजल्यावर Amara Family या मसाज सेंटरमध्ये आज (दि. १५) करण्यात आली. या कारवाईत ‘स्पा’ ची मॅनेजर व मालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शान मेहमुद खान (वय ३६ वर्षे रा. प्राधिकरण, पुणेे)असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव असून स्पा सेंटरची मालक महिला आरोपी (वय ५० वर्षे) फरार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,मुंबई-पुणे हायवे रोडवरील Inspiria मॉलमधील चौथ्या मजल्यावर Amara Family या मसाज सेंटरमध्ये अवैद्यरित्या  वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती सामाजिक सुरक्षा विभागातील कर्मचाऱ्यांना मिळाली होती.

या माहितीच्या आधारे पोलिसांनी Inspiria  या मॉलमधील चौथ्या मजल्यावर Amara Family या मसाज सेंटरमध्ये बनावट गिहाईक पाठवून सदर ठिकाणी मुलींकडून अवैधरित्या वेश्याव्यवसाय करुन घेतला जातो याबाबत खात्री करून सदर ठिकाणीं सोमवारी (दि. १५) रोजी छापा टाकून ०५ वेश्याव्यवसाय करणाऱ्या महिलांची सूटका करुन सदर ‘स्पा’ ची मॅनेजर व मालक यांच्या विरोधात निगडी पोलीस ठाण्यात अनैतीक मानवी वाहतूक प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३,४,५ भादवि कलम ३७०(३).३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सदर कारवाईत ३६ हजार रोख रक्कम, २१ हजार रुपये किमतीचे २ मोबाईल,५५ रुपये किमतीचे  साहित्य असा एकूण ५७ हजार ५५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आले असून असुन पुढील तपास निगडी पोलीस स्टेशन करीत आहे.

 

सदरची कामगिरी सदरची कामगिरी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश, अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे,  पोलीस उप-आयुक्त सुधिर हिरेमठ, सहा. पोलीस आयुक्त. प्रेरणा कट्टे, यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विठ्ठल कुबडे, सपोनि डॉ. अशोक डोंगरे, मसपोनि निता उबाळे, सपोफो विजय कांबळे, पोना नितीन लोंढे, पोना अनिल महाजन, पोना बारकुले, मपोना संगीता जाधव, पोशि मारुती करचुंडे, पोशि राजेश कोकाटे, पोशि गणेश कारोटे, मपोशि सोनाली जाधव यांनी केली.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.