महाराष्ट्र नाभिक महामंडळ पुणे जिल्हा व महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने १० वी अणि १२ वी गुणवंत विद्यार्थीचा सत्कार
पिंपरी चिंचवड : महाराष्ट्र नाभिक महामंडळ पुणे जिल्हा व महिला आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने १० वी अणि १२ वी गुणवंत विद्यार्थीचा सत्कार समारंभ करण्यात आला तसेच नाभिक समाजातील मान्यवरचां उल्लेखनीय क्षेत्रामध्ये काम केलेल्या माननीय श्री ह.भ. प रविकांत रसाळ (धार्मिक क्षेत्र) व रमाकांत राऊत (संगीत क्षेत्र)याना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले
त्यावेळी बोलताना महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे साहेब म्हणाले,स्वातंत्र्य नंतरच्या काळा पासून ते आज पर्यंत बारा बलुतेदार समाजामध्ये प्रमुख घटक असणाऱ्या नाभिक समाजाला सामाजिक शैक्षणिक राजकीय व सांस्कृतिक वारसा होता परंतु राज्यकर्ते आणि शासन कर्त्या जमातीने जातीच्या नावाखाली या समाजावर अन्याय या ठिकाणी केलेला आहे अशा परिस्थितीमध्ये शाहू फुले आंबेडकरांचे विचार घेऊन नाभिक समाजाने शिक्षणामध्ये भरारी घेऊन नाव लौकिक निर्माण करावा आणि upsc एमपीएससी संबंधात शासन दरबारी ज्या विद्यार्थ्यांच्या अडचणी आहेत त्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न या सरकारच्या माध्यमातून आपण करणार आहोत व स्वतंत्र व्यवस्था निर्माण केल्या जाईल या बाबतीमध्ये शासनाने धोरण स्वीकारणे भाग पाडण्याचे काम आपण करू या यामध्ये बारा बलुतेदार साठी सव्वा तीनशे कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे त्यापैकी शंभर कोटी रुपयांची तरतूद स्वतंत्र केलेली नाभिक समाजा ने याचा लाभ घावा मुख्यमंत्र्यांकडे समाजाच्या प्रलंबित मागण्या च पाठपुरावा करण्यात येईल.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महामंडळाचे प्रदेशाध्यक्ष कल्याणराव दळे साहेब,उद्घाटक जय बाबा गुरुवर्य माऊली महाराज वाळुंजकर, सुधिर शिर्के (लोणावळा उपनगराध्यक्ष), केशव घोळवे (उपमहापौर पिं चिं), सतीश दरेकर( माजी नगरसेवक), योगिता कदम (सरपंच), वैशाली खाडे (स्वीकृत.सदस्य ),अनिताताई मगर (जिल्हा महिला अध्यक्ष), रमेश राऊत (जिल्हाध्यक्ष), अशोक राव मगर (गुणवंत विद्यार्थी सत्कार समिती समन्वयक), प्रभाकर भालेकर (अध्यक्ष गुणवंत विद्यार्थी समिती, उपाध्यक्ष अरुण शेठ ढमाले, गणेश वाळुंजकर (शहराध्यक्ष पिं. चिं), सुनील वाळुंज, दत्तात्रय वाळुंजकर कांताराम आढाव, गणेश राऊत, आदिनाथ गायकवाड,गणेश शिंदे (कार्याध्यक्ष),नितीन कुटे (भोसरी विभाग अध्यक्ष), कविता यादव (महिला अध्यक्ष पिं चिं), भीष्मा गायकवाड (कार्यकारणी सदस्य), Ad मोनिका निकम, विजय पवार, शुभदा राऊत, शितल शिंदे, सुजाता अपूर्ण, सुशीला ढमाले, उर्मिला गायकवाड, सुवर्णा सुर्वे इत्यादी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक अशोक राव मगर यांनी केले तर भाऊसाहेब यादव यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तानाजी वाळुंजकर आणि कु अंकिता मगर यांनी केले
Good job