माजी आमदार हर्षवर्धन जाधवांविरुद्ध हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा

पुणे :कन्नड विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांचे जावई हर्षवर्धन जाधव यांच्याविरुद्ध हत्येचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील चतु:श्रृंगी पोलिस ठाण्यात हा गुन्हा दाखल झाला आहे. माजी आमदार हर्षवर्धन जाधव आणि इषा झा यांनी हत्येचा प्रयत्न केल्याची नोंद या गुन्ह्यात आहे.त्यानंतर आता चतुर:श्रुंगी पोलिसांनी हर्षवर्धन जाधव आणि इशा झा यांना पोलीस स्टेशनला आणून ताब्यात घेतले असून त्यांच्या अटकेची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

याबाबत अमन अजय चड्डा (वय 28, रा. भाऊ पाटील रोड, पुणे. आयटी पार्क समोर, बापोडी, पुणे) यांनी तक्रार दिली आहे. त्यानुसार हर्षवर्धन रायभान जाधव (वय 43, रा. बालेवाडी, पुणे) आणि इषा बालाकांत झा (वय 37, रा. वाकड) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार चड्डा यांचे आई आणि वडील हे सोमवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास दुचाकीवरून औंध येथून ब्रेमन चौकाकडे जाणार्‍या रस्त्यावरून संघवी नगरकडे जात होते. त्यावेळी हर्षवर्धन यांनी चारचाकीचा दरवाजा अचानकपणे उघडला. त्यामुळे अपघात झाला.

त्याबाबत चड्डा यांच्या वडिलांनी हर्षवर्धन जाधव यांना जाब विचारला. चड्डा यांच्या वडिलांनी त्यांचे हार्टचे ऑपरेशन झाले आहे हे देखील जाधव यांना सांगितले. त्यानंतर देखील आरोपींनी संगनमत करून चड्डा यांच्या आई आणि वडिलांच्या छातीवर आणि पोटावर लाथा मारल्या. या प्रकरणी चड्डा यांनी तक्रार दिल्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हर्षवर्धन जाधव आणि इषा झा यांना अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणी चतु:श्रृंगी पोलीस अधिक तपास करत आहेत.

हर्षवर्धन जाधवांचा राजकारणातून संन्यास!

हर्षवर्धन जाधव यांनी मे महिन्यात एक व्हिडीओ संदेश जारी करुन आपण राजकारणातून संन्यास घेत असल्याचं जाहीर केलं होतं. आपण ज्या गोष्टींसाठी विनाकारण पळत राहतो. त्या कितपत खऱ्या आहेत याची जाणीव मला झाली आहे. म्हणून मी राजकारणातून निवृत्ती घेत आहे. माझी उत्तराधिकारी पत्नी संजना जाधव असेल, असं हर्षवर्धन जाधव म्हणाले होते.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.