व्याजाने घेतलेले २३ लाख दे, नाहीतर जिवंत सोडणार नाही 

पिंपरी चिंचवड : व्याजाने घेतलेले तेवीस लाख रूपये दे नाहीतर जिवंत सोडणार नाही अशी धमकी देवून शिवीगाळ करीत तरूणाला लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली.याप्रकरणी तीन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना शनिवारी (दि. १२) रात्री अकरा वाजताच्या सुमारास बावधन बुद्रुक येथे घडली.

 

ईश्‍वर एकनाथ दगडे, सूरज हरिश्‍चंद्र पडवळ, मयूर प्रकाश वेडे (सर्व रा. बावधन) अशी आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी विश्‍वास कैलास दगडे (रा. बकाजी कॉर्नर, बावधन) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,फिर्यादी व आरोपी एकमेकांच्या ओळखीचे आहे. फिर्यादी यांनी आरोपींकडून पैसे घेतले आहेत. ते पैसे मागण्यासाठी शनिवारी रात्री आरोपी फिर्यादी यांच्या  घरात शिरले.”व्याजाने घेतलेले तेवीस लाख रूपये दे नाहीतर तुला जिवंत सोडणार नाही’ अशी फिर्यादीला धमकी देत शिवीगाळ केली. लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण करून दरवाजावर लाथा मारत जिवे मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून पोलिस अधिक तपास करीत आहेत.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.