ह्रदयद्रावक ! पुण्यात विवाहितेची ९ महिन्यांच्या मुलीसह रेल्वेखाली आत्महत्या

लोणी काळभोर : लोणी काळभोर येथील पुणे – दौंड रेल्वे मार्गावर एका विवाह‌ितेने आपल्या ९ महिन्यांच्या चिमुकल्या मुलीसह रेल्वेखाली आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. सोमवारी (दि.१४) रात्री ही घटना घडली.

शितल देवराम मखवाने (वय २७) आणि शुभ्र (वय ९ महिने) अशी मृत्युमुखी पडलेल्या या दोघांची नावे आहेत. याप्रकरणी मयत महिलेचे मामा विजय रामचंद्र साळुखे (वय ४१) यांनी फिर्याद दिली आहे.लोणी काळभोर पोलिसानी शितल व मुलगी शुभ्रा यांची अकस्मात मृत्यु अशी नोंद केली आहे.

लोणी काळभोर पोलिसांनी माहितीनुसार,मयत शितल यांचा विवाह १५ वर्षापुर्वी झालेला असून त्यांना ४ मुली आहेत. गेले ९ महिने पासून त्या व मुलगी शुभ्रा या दोघी आजीकडे लोणी काळभोर येथे रहात होत्या. दरम्यान सोमवारी रात्री साडेनऊ वाजनेच्या सुमारास पुणे-दौंड रेल्वेलाईनवर शितल व शुभ्रा या दोघींचे मृतदेह लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील रामा कृषी रसायन लिमिटेड या कंपनीजवळ आढळुन आले. याबाबतची माहिती मिळताच, लोणी काळभोर पोलिसांनी दोघींचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पुण्यातील शासकीय रुग्नालयात हलविले. पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक संदीप बोरकर व त्यांचे सहकारी करीत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.