आंदोलन करुन शाळेची बदनामी करु अशी धमकी देऊन खंडणी मागणाऱ्या मनसे जिल्हा संघटकाला अटक

पिंपरी चिंचवड :आंदोलन करुन शाळेची बदनामी करु अशी धमकी देऊन १ लाख रुपयांची खंडणी मागणाऱ्या व ३० हजार रुपये उकळणाऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या जिल्हा संघटकाला चाकण पोलिसांनी अटक केली आहे

अभय अरूण वाडेकर (रा. चाकण, ता खेड) असे अटक करण्यात आलेल्या पुणे जिल्हा संघटकाचे नाव आहे. याप्रकरणी महेंद्र इंद्रनिल सिंग (वय 51, रा. इंद्रायणीनगर, भोसरी) यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक आरोपी अभय अरूण वाडेकर हा पुणे जिल्हा संघटक आहे. त्याने 27 नोव्हेंबरला प्रियदर्शनी इंग्लिश मिडियम स्कूल मध्ये मनसेच्या सात ते आठ कार्यकर्त्यासह जाऊन लॉकडाऊन मध्ये शाळेने जास्त फि का आकारली यावरून धमकी दिली व त्याप्रकरणी निवेदनही दिले. 5 डिसेंबरला आरोपीने फिर्यादी महेंद्र सिंग यांना भोसरीतील नाना नानी पार्क येथे भेटून शाळेसमोर आंदोलन करून शाळेची बदनामी करण्याची धमकी दिली. शाळेची बदनामी टाळायची असेल तर, एक लाख रूपये खंडणी दे अशी मागणी केली. त्याच वेळी फिर्यादी यांच्याकडून त्यांने पाच हजार रूपये देखील घेतले.

सात डिसेंबरला आरोपीने आंबेठान चौकाजवळ महेंद्र सिंग यांच्याकडून 25 हजार घेतले. एकूण तीस हजार रूपये दिल्यानंतर, यापुढे आणखी पैसे देऊ शकणार नासल्याचे फिर्यादीने सांगितले. मात्र, उर्वरित पैसे न दिल्यास आरोपीने शाळेच्या बदनामीची धमकी दिली व परत पैशांसाठी फिर्यादीला फोन केला. महेंद्र सिंग यांनी पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. दाखल फिर्यादीनुसार पोलिसांनी अरोपीला अटक केली आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.