चांगली बातमी ! स्वदेशी ‘कोवॅक्‍सिन’च्या पहिल्या टप्प्यातील निष्कर्ष सकारात्मक

 

नवी दिल्ली : देशात एकीकडे कोरोनाची रूग्णसंख्या कमी होताना दिसत आहे. तसेच काही कंपन्या कोरोनाला रोखण्यासाठी लस निर्मीती करण्याचा प्रयत्न करत आहेत. या सर्वात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. हैदराबादमधील स्वदेशी कंपनी भारत बायोटेक करोना व्हायरसवर ‘कोव्हॅक्सिन’  लस विकसित केली आहे. ‘लसमुळे रोगप्रतिकार शक्ती निर्माण झाली आणि लसचे कोणतेही विपरीत परिणाम (साइड इफेक्ट ) दिसून आले नाहीत’, या लसीच्या पहिल्या टप्प्यातील चाचणीचा निष्कर्ष कंपनीने बुधवारी संध्याकाळी जाहीर करताना सांगितलं.

‘या लसीमुळे न्यूट्रलाइजिंग अँटीबॉडीजला (एक प्रकारची रोगप्रतिकारक प्रतिक्रिया) चालना मिळाली आणि सर्व प्रकारच्या डोस ग्रुपमध्ये याला चांगला प्रतिसाद मिळाला आणि या लसीशी संबंधित कोणताही विपरित परिणाम दिसून आला नाही’, असं कंपनीने सांगितलं.

 

पहिल्या लसीकरणानंतर काही स्वयंसेवकांमध्ये हलक्‍या आणि मध्यम प्रकारचा परिणाम दिसून आला आणि ते लगेच बरेही झाले. त्यासाठी कोणत्याही प्रकारच्या औषधांचा वापर करण्याची गरज भासली नाही. दुसऱ्या डोसनंतरही हेच परिणाम समोर आले. लसीकरणानंतर समोर आलेल्या परिणामांनुसार, “एका स्वयंसेवकामध्ये लसीकरणानंतर काही गंभीर परिणाम समोर आले होते. स्वयंसेवकाला जुलै 30 मध्ये लसीचा डोस दिला होता. पाच दिवसांनी स्वंयंसेवकामध्ये कोरोनाची लक्षणे आढळून आली आणि त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.” त्यामध्ये सांगण्यात आल्यानुसार,”ही हलक्‍या स्वरुपाची लक्षणं होती. परंतु, रुग्णाला 15 ऑगस्टला रुग्णालयात भर्ती करण्यात आले होते. न्यूक्‍लिक ऍसिड परिणाम नकारात्मक आल्यानंतर स्वयंसेवकाला 22 ऑगस्ट रोजी रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. हे प्रकरण लसीकरणा संबंधित नव्हते.” एकूण 11 रुग्णालयांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी, 375 स्वयंसेवकांचा परिक्षणांमध्ये समावेश करण्यात आला होता.

भारत बायोटेकने कोवॅक्‍सिनच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. भारत बायोटेकच्या वतीने सात डिसेंबर रोजी डीसीजीआयकडे परवानगी मागण्यासाठीचा अर्ज दाखल करण्यात आला होता. तसेच भारत बायोटेक व्यतिरिक्त पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटनेही ऑक्‍सफर्डची कोरोना लस कोविशिल्डच्या वापरासाठी 6 डिसेंबरला परवानगी मागितली होती. याआधी अमेरिकन औषध कंपनी फायझरने आपल्या लसीच्या आपत्कालीन वापरासाठी चार डिसेंबर रोजी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली होती.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.