चेक’ ने व्यवहार करताय? मग 1 जानेवारीपासून लागू होणार ‘हा’ नवा नियम

मुंबई :बँकिंग क्षेत्रातील घोटाळे आणि बँक ग्राहकांची होणारी फसवणूक थांबवण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया 1 जानेवारी 2021 पासून चेक पेमेंटसाठी ‘पॉझिटिव्ह पे सिस्टम ‘लागू करण्याची शक्यता आहे.

पॉझिटिव्ह पे सिस्टम अशी काम करणार-

पॉझिटिव्ह पे सिस्टमअंतर्गत जो चेक देईल त्याला चेकची तारीख, लाभार्थ्याचे नाव, प्राप्तकर्त्याचे नाव आणि इलेक्ट्रॉनिक पद्धतीने देयकाची रक्कम सांगावी लागणार आहे.

खोट्या चेकद्वारे होणारा बँकिंग घोटाळा रोखण्यासाठी हा बदल करण्यात येणार आहे. व्यक्ती एसएमएस, मोबाइल ॲप, इंटरनेट बँकिंग किंवा एटीएम सारख्या इलेक्ट्रॉनिक माध्यमांद्वारे ही माहिती देऊ शकतो.

बँक 50,000 रुपये आणि त्यावरील जास्त रक्कम असणाऱ्यांसाठी ही सिस्टम अनिवार्य करु शकतात.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.