नागपूर येथील मेडिट्रीना मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलसंदर्भातील तक्रारींची तातडीने चौकशी करण्याचे विधानसभा अध्यक्षांचे आदेश
मुंबई : नागपूर येथील मेडीट्रीना मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत गैरव्यवहार झाल्याच्या तक्रारीसंदर्भात या हॉस्पीटलची तातडीने चौकशी करावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले.
नागपूर येथील मेडीट्रीना मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत गैरव्यवहार प्रकरणी तक्रारीसंदर्भात विधानभवन येथे बैठक झाली.
यावेळी उर्जामंत्री डॉ.नितीन राऊत,आमदार विकास ठाकरे, राजू पारवे, आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदिप व्यास तसेच संबधित विभागाचे आधिकारी उपस्थित होते.
महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत बोगस पेंशन्ट दाखवून पैसे उकळणे याबाबत गुन्हा दाखल केला पाहिजे. तसेच त्या हॉस्पीटलचा परवाना रद्द करावा अशी मागणी आमदार विकास ठाकरे यांनी यावेळी केली.
मेडीट्रीना मल्टीस्पेशालिटी हॉस्पीटल येथे शासनाच्या विविध योजनांतर्गत अनेक रुग्णांच्या नावे रकमेची उचल करुन रुग्णांकडूनही रक्कम वसुल केल्याप्रकरणीच्या तक्रारींची संबंधित विभागाने तातडीने चौकशी करावी, असे निर्देशही श्री.पटोले यांनी दिले.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!