येलवाडी येथे १९ वर्षीय तरुणाकडून विक्रीसाठी आणलेली १०७ लिटर ताडी जप्त
पिंपरी चिंचवड : पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका 19 वर्षीय तरुणाकडून विक्रीसाठी आणलेली 107 लिटर ताडी जप्त केली. ही कारवाई खेड तालुक्यातील येलवाडी येथे केली.
गुरुरमनय्या भंडारी (वय 19, रा.खालुंब्रे, पवारवाडी, ता.खेड) असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे. याबाबत पोलीस शिपाई दादा धस यांनी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी भंडारी याने येलवाडी येथे 107 लिटर ताडी पोत्यामध्ये भरुन विक्रीसाठी आणली. ताडी विक्रीचा भंडारी याच्याकडे कोणताही परवाना नाही. त्याने बेकायदेशीरपणे ताडी विक्रीसाठी आणली असल्याने पोलिसांनी त्याच्याकडून 10 हजार 700 रुपये किमतीची 107 लिटर ताडी आणि 250 रुपये रोख रक्कम जप्त केली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!