रेल्वेप्रवासात आता ओळखपत्र अनिवार्य असेल – जाणून घ्या भारतीय रेल्वेचे महत्वाचे अपडेट
मुंबई : रेल्वेप्रवासात आता आतापर्यंत इंटरनेटद्वारे अथवा तत्काळ सेवेत तिकीट काढणारे प्रवासी तसेच वातानुकूलित श्रेणीतून प्रवास करणारे प्रवासी यांनाच ओळखपत्र आवश्यक होते. आता मात्र सर्व श्रेणीच्या प्रवाशांना आपले मूळ ओळखपत्र प्रवासादरम्यान दाखवावे लागेल – १ डिसेंबरपासूनच हा नियम लागू केला आहे असे भारतीय रेलवेने सांगितले
तर रेल्वे मंत्रालयाने याआधी दोन महिन्यांपूर्वी ओळखपत्र अनिवार्य करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती , दरम्यान तिकिटांचा काळा बाजार आणि दलालांना रोखण्यासाठी हा निर्णय घेतला आहे असे भारतीय रेलवेने स्पस्ट केले आहे
जाणून घ्या ओळखपत्रांची यादी
भारतीय रेल्वे विभागाने दिलेल्या माहितीप्रमाणे , निवडणूक ओळखपत्र, पासपोर्ट, पॅनकार्ड, वाहन परवाना, केंद्र किंवा राज्य शासनाने दिलेली छायाचित्र असलेली सरकारी ओळखपत्रे, छायाचित्र असलेले बँकांचे पासबुक, बँकांनी लॅमिनेट करून दिलेली फोटो क्रेडिट कार्ड, आधार कार्ड, पेन्शन पे ऑर्डर, फोटो रेशनकार्ड, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र, बीपीएल कार्ड, ईएसआय फोटो कार्ड, सीजीएचएस ओळखपत्र, शाळा-महाविद्यालयांचे विद्यार्थी ओळखपत्र , इत्यादी पैकी ओळखपत्र प्रवासादरम्यान आवश्यक आहे .
भारतीय रेल्वे विभागाकडून
असलेले हे अपडेट नागरिकांसाठी खरोखर खूप महत्वाचे आहे , आपण इतरांना देखील अवश्य शेअर करा
Leave a Reply
Want to join the discussion?Feel free to contribute!