कुरियर बॉय असल्याचे सांगत ‘मुथूट फायनान्स’वर दरोडा,1 कोटींच्या सोन्यावर घातला दरोडा

वर्धा : शहरातील मध्यवस्तीत हॉटेल रामाकृष्णाच्या बाजूला असलेल्या मुथूट फायनान्स कंपनीवर काळे कपडे घालून आलेल्या चौघांनी बंदुकीच्या धाकावर दरोडा टाकला. ही घटना 17 डिसेंबरला सकाळी 9.30 वाजताच्या सुमारास घडली.यात अडीच किलो सोनं, 3 लाख 28 हजार रुपयांची रोख लंपास झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणी चौकशीसाठी फायनान्स मॅनेजर ताब्यात घेण्यात आले आहे.

मिळालेल्या माहिती नुसार, हॉटेल रामाकृष्णाच्या बाजूला असलेल्या मुथूट फायनान्समध्ये सकाळी 9 वाजताच्या सुमारास कुरिअर बॉय असल्याचे सांगून तिघेजण आले. त्यांच्या हातात बँकेतील तीन कर्मचार्‍यांच्या नाव असलेले लिफाफे होते. त्यांनी बँकेचे निरीक्षक करून खाली काळे कपडे घालून उभा असलेल्या पुन्हा एका सहकार्‍याला बँकेत बोलावले. काही वेळात बँकेतील तीन कर्मचार्‍यांना बंदूक आणि चाकू दाखवत बँकेतील लोखपालाच्या लोखंडी कठड्यात बंद केले. त्यानंतर बँकेत ग्राहकांचे जमा असलेले जवळपास साडेतीन किलो सोने आणि 3 लाख 28 हजार रुपये रोख लंपास केली. त्यानंतर तिघेही बँकेतून खाली उतरले. बँकेच्या खाली उभे असलेल्या महिला कर्मचार्‍याच्या पोटावर बंदूक रोखून तिला तिच्या वाहनाची चावी मागून तेच वाहन घेऊन दरोडेखोर पसार झाले. अवघ्या अर्ध्या तासात दरोडेखोरांनी गजबजलेल्या भागात दरोडा टाकल्याने पोलिसांसह सर्वांनाच आश्‍चर्य वाटू लागले आहे.

घटनास्थळावर पोलीस उपविभागीय अधिकार्‍यांसह पोलिसांचा ताफा दाखल होऊन कारवाईला सुरुवात केली, फिंगर प्रिंट आणि स्केच साठी पोलीस कामाला लागले. शहर पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची चमू अमरावती आणि यवतमाळ येथे दाखल झाली असून आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती आहे.

फायनान्समधील 3 ट्रेमधील अडीच किलो सोने आणि 3 लाख 28 हजार रुपयांची रोकड लंपास केली. अडीच किलो सोन्याची किंमत 1 कोटी 17 लाख 50 हजार रुपये सांगतिली जात आहे. पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवीत बँकेचे मॅनेजरसह कर्मचाऱ्यांना तपासासाठी ताब्यात घेतले आहे. लवकरच आरोपी माध्यमांसमोर हजर केले जातील. असं उपविभागीय पोलीस अधिकारी पियुष जगताप  यांनी सांगितलं.

कोटी रुपयांची उलाढाल करणार्‍या मुथुट फायनान्समध्ये सुरक्षेची कोणतीही सोया दिसून आली नाही. बँकेत एकाच ठिकाणी सी सी टिव्ही कॅमेरा असून तोही कर्मचार्‍यांवर लक्ष ठेवण्यासाठीचा आहे. तसेच बँकेत सुरक्षा रक्षकही नसल्याची माहिती पोलिसांनी दिली. बँकेच्या अजब कारभाराबाबत आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.