जबरदस्तीने पतीनेच केला पत्नीवर वारंवार अनैसर्गिकरित्या लैंगिक अत्याचार

पिंपरी चिंचवड : पीडित विवाहितेवर पतीने जबरदस्तीने वारंवार अनैसर्गिकरित्या लैंगिक अत्याचार केला. पतीच्या सासू आणि दोन मामे सास-यांनी चिथावणी दिली तसेच विवाहितेवर दबाव आणून तिचा छळ केला. नवीन गिरणी सुरु करण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये आणण्याची मागणी केली. याबाबत पती, सासू आणि दोन मामे सासरे अशा चौघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पतीला अटक करण्यात आली आहे.हा प्रकार २४ एप्रिल २०१९ ते २५ जून २०२० या कालावधीत वैदूवाडी हडपसर आणि कावेरीनगर वाकड येथे घडला.

अभिजीत रमेश बागुल (वय २७ वर्ष रा., हडपसर, पुणे )असे अटक केलेल्या पतीचे नाव असून सासु , मामे सासरे दिलीप पाबळकर उर्फ बाळुमामा, मामे सासरे संजय शेंबडे उर्फ सुजमामा (रा.पाबळगांव) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पिडीत विवाहितेने फिर्याद दिली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार,आरोपी पतीने पीडित विवाहितेला गुलामासारखे वागवले. दारूच्या नशेत विवाहितेला अश्लील व्हिडीओ दाखवून विवाहितेच्या इच्छे विरोधात तिच्यावर अनैसर्गिकरित्या वारंवार लैंगीक अत्याचार केला. पतीच्या कृत्यासाठी सासू आणि दोन मामे सास-यांनी समर्थन दिले. नात्याचा दबाव आणून अनैसर्गिक संबंधांबाबत जाहीर वक्तव्य करून विवाहितेचा विनयभंग केला. आरोपी पती आणि सासूने विवाहितेकडे नवीन गिरणी टाकण्यासाठी माहेरहून दहा लाख रुपये आणण्याची मागणी केली. विवाहितेचे सर्व दागिने काढून घेऊन तिला घरातून हाकलून देत तिचा मानसिक व शारीरिक छळ केला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.