जुन्या भांडणाच्या कारणावरून तरुणाला कोयत्याने मारहाण

पिंपरी चिंचवड : जुन्या भांडणाच्या कारणावरून दोघांनी मिळून एका तरुणाला मारहाण करून त्याच्यावर कोयत्याने वार केले. यात तरुणाच्या डोक्यात गंभीर दुखापत झाली. ही घटना गुरुवारी (दि. 17) सकाळी नऊ ते साडेअकरा वाजताच्या कालावधीत बौद्धनगर, पिंपरी येथे घडली.

अनिल बिरेंदर राम (वय 25, रा. बौद्धनगर, पिंपरी) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याबाबत त्यांनी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गौतम दीपक कदम आणि त्याच्या एका साथीदाराच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अनिल आणि आरोपी यांचे मागील काही दिवसांपूर्वी अनेक वेळा भांडण झाले आहे. त्या भांडणाच्या रागातून आरोपीने फिर्यादी यांच्याशी धक्का देऊन भांडण काढले. त्यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्यानंतर फिर्यादी यांना गाठून त्यांच्या डोक्यात कोयत्याने वार करून जखमी केले.यात फिर्याद गंभीर जखमी झाले आहेत. पिंपरी पोलीस तपास करीत आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.