दिल्लीत रात्री उशिरा भूकंपाचे धक्के; कडाक्याच्या थंडीत लोक घराबाहेर

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. हे भूकंपाचे धक्के जाणवताच लोक घराबाहेर पडले.रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता ४.२ इतकी होती आणि त्याचं केंद्र गुरुग्रामच्या दक्षिण-पश्चिमेस ४८ किलोमीटर अंतरावर होते.भूकंपाचे धक्के गुरुवारी रात्री ११.४५ वाजेच्या सुमारास जाणवले. यामुळे जीवित किंवा मालमत्तेचं नुकसान झाल्याची माहिती नाही.

दिल्लीत गुरुवार हा थंडीचा दिवस होता. दिल्लीत सामान्यापेक्षा तापमान ७ डिग्रीपेक्षा खाली होते. हे या हंगामातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान आहे. अशा परिस्थितीत रात्री उशिरा झालेल्या भूकंपामुळे येथील लोकांच्या समस्याही वाढल्या आहेत

यापूर्वी २ डिसेंबरला दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले होते. या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर २.७ इतकी होती. भूकंपाचा केंद्रबिंदू गाझियाबादमध्ये होता. पहाटे ४ वाजून ५ मिनिटांनी हा भूकंप झाला होता. यावर्षी दिल्ली-एनसीआरमध्ये भूकंपाचे धक्के बर्‍याच वेळा जाणवले आहेत. दिल्ली-एनसीआरमध्ये एप्रिलनंतर १५ पेक्षा जास्त वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. यावेळी भूकंपाचे केंद्रबिंदू दिल्लीच्या जवळपासच्या भागात होते.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.