मोठी ब्रेकिंग ! नरभक्षक बिबट्याला मारण्यात अखेर वनविभाला यश

सोलापूर : बीड, नगरमार्गे सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात तीन बळी घेणाऱ्या नरभक्षक बिबट्याला मारण्यात वनविभाला अखेर यश आलं आहे. डॉ. धवलसिंह मोहिते पाटील यांच्या गोळीने बिबट्याचा वेध घेतला.नरभक्षक बिबट्याला ठार करण्यासाठी मुख्य प्रधान वनसंरक्षकांनी गोळ्या घालून ठार करण्यास परवानगी दिली. त्यानंतर शंभरहून अधिक बंदुकधारी कर्मचारी बिबट्याच्या मागावर होते. आज (शुक्रवारी) सायंकाळी सहा ते सव्वासहाच्या सुमारास वांगी क्र. चार रांखुडे वस्तीवर पांडुरंग रांखुडे यांच्या केळीच्या बागेत बिबट्याला ठार करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून या नरभक्षक बिबट्यामुळे तालुक्यात दहशत पसरली होती.

अकलूज येथील डॉ. धवलसिंह मोहिते पाटील हे बारामतीचे तावरे यांचे सहकारी म्हणून ऑपरेशनमध्ये सामील झाले होते. वांगी येथे बिबट्याला केळीच्या बागेत वेढल्यावर या बिबट्याने धवलसिंह यांच्यावर हल्ला करायचा प्रयत्न केला. मात्र, अतिशय सावध असलेल्या मोहिते पाटील यांनी 15 फुटावर असलेल्या या नरभक्षक बिबट्यावर 3 गोळ्या फायर करीत त्याला ठार केले.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.