सराईत दुचाकी चोरांना अटक, ९ गुन्हे उघडकीस

पुणे : ग्रामीण भागात मोटार सायकल चोरी करणार्या २ सराईत चोरांना पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलीसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून 13 मोटार सायकली जप्त केल्या असून नारायणगाव  व आळेफाटा या परिसरातील ६ तर अकोले ताालुक्यातील ३ गुन्हे उघडकीस आले आहे.

सचिन बाळु दिघे (वय 31 रा. ढगेवाडी, पळसपुर ता. पारनेर जि. अहमदनगर ),ऋशीकेष किसन दरेकर (वय 20 वर्ष. रा. पारगाव तर्फे आळे ता. जुन्नर जि. पुणे) असे अटक केलेल्या आरोपीचे नावे आहेत.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक व्यक्ती चोरी केलेली मोटार सायकल विक्री करण्यासाठी पारगाव तर्फे आळे येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी पारगाव तर्फे आळे येथे जावुन सापळा रचुन दोघांना ताब्यात घेतले. त्याच्याकडून ९ गुन्हे उघडकीस आणून १३ मोटर सायकल जप्त करण्यात आले आहे.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.