‘हा’ मेसेज येणाऱ्यांना मिळणार कोरोना लस; टोपेंकडून मायक्रो प्लॅनिंगची माहिती

मुंबई :गेल्या अनेक महिन्यांपासून कोरोनाने थैमान घातले आहे. परंतू आता कोरोनाची लस प्रगतीपथावर आहे. केंद्र सरकारने कोरोना लसीकरणाबाबत मायक्रो प्लॅनिंग सुरु केले आहे. याबाबत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माहिती दिली आहे.

‘ज्या तारखेला लस द्यायची आहे त्या संबंधीचा मेसेज त्या व्यक्तीला केला जाईल. त्यानंतर ती व्यक्ती आल्यावर ओळख पटवली जाईल. त्यानंतर त्याला लस देण्यात येईल’ असे ते म्हणाले.

“१८ हजार लोकांना ट्रेनिंग द्यायचे काम आता पूर्ण होईल. स्टोरेजसाठी कोल्डचेन व्यवस्था झाली आहे. लस देण्यासाठी कार्यपद्धती आहे. ज्या तारखेला लस द्यायचे आहे, त्या व्यक्तीला मेसेज मिळेल, तो येणार,त्याची ओळख पटल्यावर त्याला लस देणार, असं मायक्रो प्लॅनिंग सुरु असल्याचे” टोपे म्हणाले.

तसेच “उत्तर प्रदेशात मेडिकल स्टाफच्या सुट्ट्या रद्द केल्या. पण आपल्याला तसे काही करायची गरज नाही. मनुष्यबळ उपलब्ध आहे. गरज पडली तर सुट्टी रद्द होईल”, असेही टोपेंनी सांगितले.

तर “लसीकरणाबाबत केंद्र सरकार माहिती मागवत आहे. हेल्थ वर्कर्स, अत्यावशक सेवेतील कर्मचारी, ५० वर्षांवरील नागरिक शिवाय इतर आजार असलेले ५० वर्षांवरील नागरिक यांची माहिती गोळा केली जाते आहे असेही आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले.

…तर जानेवारीपासून लसीकरण

लस केंद्र सरकार पुरवेल अशी माझी खात्री आहे. जी कामं राज्य सरकारनं करायची आहेत ती आम्ही करत आहोत. लॉजिस्टिक,डेटा सगळं आम्ही करत आहोत. लसीकरणाच्या परिणामाबाबत एक युनिट तयार केलं आहे. साधारण दोन कंपन्या सिरम आणि भारत बायोटेक यांनी लसीबाबत केंद्राकडे परवानगी मागितली आहे. आता केंद्राला निर्णय घ्यायचा आहे. लसीकरण कार्यक्रमासाठी आम्ही तयार आहोत. डिसेंबर शेवटपर्यंत केंद्राने परवानगी दिली तर जानेवारीपासून लसीकरण सुरु होईल पण केंद्राने परवानगी दिली तर, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.