अनैतिक संबंधाच्या संशयावरून पत्नीच्या पोटात चाकू भोसकून खून

बेळगाव : अनैतिक संबंधाच्या संशयावरून पतीने पत्नीचा पोटात चाकू भोसकून खून केल्याची घटना शुक्रवारी (दि. १८) रात्री बेळगांव येथील ऑटोनगर येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे.

सखुबाई पुंडलिक लमानी (वय ३२, मूळ रा. रामापूर लमानी तांडा सध्या रा. ऑटोनगर असे) खून झालेल्या विवाहितेचे नाव आहे. माळमारुती पोलिसांनी पती पुंडलिक लमानी याला अटक केली आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, मूळचे रामपूर लमानी तांडा येथील दाम्पत्य कामानिमित्त गेल्या काही वर्षांपासून ऑटोनगर येथे भाड्याच्या घरात वास्त्यव्यास आहेत. मात्र, पत्नी सखुबाईवर पती पुंडलिक याचा संशय होता. त्यामुळे वरचेवर त्यांच्यात खटके उडत होते.काल रात्री पुंडलिकने अचानक पत्नीबरोबर भांडण काढून पोटात चाकू भोसकल्याने ती रक्ताच्या थारोळ्यात कोसळून जागीच ठार झाली. घटनेची माहिती समजताच माळमारुती पोलिस ठाण्याचे निरीक्षक सुनील पाटील व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली पंचनामा केला. मारेकरी पतीला पोलिसांनी ताब्यात घेऊन तपास चालविला आहे.

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.