आसामहून पोटापाण्यासाठी पिंपरीत आलेल्या कामगाराचा कठीण वस्तूने डोक्यात मारून खून

पिंपरी चिंचवड : कठीण वस्तूने डोक्यात मारून एका कामगाराचा निघृणपणे खून करण्यात आला. ही घटना शुक्रवारी (दि. 18) सायंकाळी पिंपरी चिंचवड मधील तळवडे परिसरात उघडकीस आली आहे.

जीवन नंदलाल शर्मा (वय 40, सध्या रा. त्रिवेणीनगर, तळवडे. मूळ रा.आसाम) असे खून झालेल्या कामगाराचे नाव आहे. याप्रकरणी राहुल ज्ञानेश्वर भालेकर (वय 38, रा. त्रिवेणीनगर, तळवडे) यांनी चिखली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जीवन शर्मा हे फिर्यादी राहुल भालेकर यांच्याकडे कामाला होते. भालेकर यांची त्रिवेणीनगर तळवडे येथे पेईंग गेस्ट (पीजी) इमारत आहे. त्या इमारतीच्या देखभालीचे काम फिर्यादी यांनी मयत शर्मा यांना दिले होते. गुरुवारी (दि. 17) रात्री साडेआठच्या सुमारास शर्मा नेहमीप्रमाणे त्यांच्या खोलीत झोपले होते. दरम्यान, रात्री अज्ञात इसमाने कठीण वस्तूने शर्मा यांच्या डोक्यात मारून त्यांचा खून केला.

शुक्रवारी (ता.19) सायंकाळी फिर्यादी भालेकर यांना शर्मा त्यांच्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात पडले असल्याचे समजले. भालेकर यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली.  पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहेत. चिखली पोलिस तपास करीत आहेत.

 

0 replies

Leave a Reply

Want to join the discussion?
Feel free to contribute!

Leave a Reply

Your email address will not be published.